shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासकीय चित्रकला स्पर्धेत कदम विद्यालयाचे भरघोस यश

शासकीय चित्रकला स्पर्धेत कदम विद्यालयाचे भरघोस यश
इंदापूर प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज  इंदापूर येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये  विशेष प्राविण्य मिळविले.एलिमेंट्री परीक्षेमध्ये 62 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी 28 विद्यार्थ्यांनी बी श्रेणी मिळवली तर गौरी बनसोडे सदफ पठाण व सुमित मदने या तीन विद्यार्थ्यांना ए श्रेणी प्राप्त झाली.  इंटरमिजिएट परीक्षेमध्ये वीस विद्यार्थ्यांपैकी अठरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी वैष्णवी काशीद व आरती डाके दोन विद्यार्थ्यांना बी श्रेणी प्राप्त झाली. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक प्रकाश पापत यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे,पर्यवेक्षिका पुष्पा काळे, शाळा समिती,शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ पदाधिकारी व सदस्य तसेच माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
close