एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखरचे इ. ८ ते १० मधील एलिमेंट्री या परीक्षेला २५ विद्यार्थ्यांनी मिळवले यश.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटी संचलित एन. ई. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथील इयत्ता ८ ते १० मधील एलिमेंट्री या परीक्षेला २५ विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एंटरमिजिएट परीक्षेला एकूण १० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. सदर विद्यार्थ्यांना प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ चौधर, प्रमोद चव्हाण, संदीप रणवरे व स्वप्नाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केलेमार्गदर्शन केले. ही परीक्षा वर्धमान विद्यालय वालचंदनगर येथे घेण्यात आली. शासकीय रेखाकला २०२२ परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव धनंजय रणवरे , उपाध्यक्ष संजय रनवरे प्राचार्य चंद्रकांत रणवरे यांच्याकडून अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

