shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली विज्ञानाची गोडी जोपासली पाहिजे - केंद्रप्रमुख हागारे बी.के.

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली विज्ञानाची गोडी जोपासली पाहिजे - केंद्रप्रमुख हागारे बी.के.

एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे एकदिवशीय शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.
फोटो:   विज्ञान प्रदर्शनाचे पाहणी करताना निमसाखर केंद्रप्रमुख हागारे बि के . संस्था सचिव धनंजय रणवरे संस्था उपाध्यक्ष संजय रणवरे.

इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे या ठिकाणी विज्ञान विभागाच्या वतीने एकदिवशीय शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रप्रमुख हागारे बी.के. यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्था सचिव धनंजय रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष संजय रणवरे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांच्या उपस्थितीमध्ये हे विज्ञान प्रदर्शन पार पडले.
 यावेळी केंद्रप्रमुख हागारे बि.के. म्हणाले की, आजचा विद्यार्थी हा विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हुशार बनला आहे. त्यांनी विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली विज्ञानाची गोडी जोपासली पाहिजे. महान शास्त्रज्ञांना डोळ्यासमोर ठेवले पाहिजे व अनेक शास्त्रज्ञांची पुस्तके वाचली पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.
 संस्था सचिव धनंजय रणवरे म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी गोडी वाढली पाहिजे. भविष्यात फार मोठ्या प्रमाणात विज्ञान मेळाव्याच्या आयोजन केले जाईल असे मत व्यक्त केले.
 सर्वांना विज्ञान प्रदर्शनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
 यावेळी संजय रणवरे यांच्या हस्ते केंद्रप्रमुख हागारे बी. के. यांच्या  सन्मान करण्यात आला.
व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांचा सत्कार विज्ञान विभागाचे प्रमुख विशाल देवकाते यांच्या हस्ते करण्यात आला. संस्था विद्यालय शिक्षक व शिक्षक कर्मचारी पालक वर्ग यांच्या वतीने प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात आले व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. निमसाखर ग्रामपंचायत चे सदस्य नीता विशाल माने यांचा सत्कार विद्यालयातील शिक्षिका सोनाली शेंडे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रणवरे तसेच पर्यवेक्षक मधुकर खरात व कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विभागांनी विज्ञान प्रदर्शन पार पाडले.
close