काटेश्वर विद्यालय काटीमध्ये आदर्श कामगिरी करणाऱ्या एका शिक्षकाची आदर्श शिक्षक म्हणून प्रत्येक वर्षी केली जाते निवड.
इंदापूर प्रतिनिधी: सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रक्रमाने कार्यरत असणारे प्रा.विपुल बबन वाघमोडे सर यांच्या माध्यमातून नेहमीच गुणवंतांचा सन्मान केला जात असतो. त्याचाच एक भाग म्हणून प्रजासत्ताक दिनी काटेश्वर विद्यालय काटीमध्ये आदर्श कामगिरी करणाऱ्या एका शिक्षकाची आदर्श शिक्षक म्हणून प्रत्येक वर्षी निवड केली जात असते. त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून इ.१० वी व १२वीच्या गुणवंतांचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने केला जात असतो. प्रा.विपुल वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष या नात्याने विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील व तत्पर असतात. यातूनच यावर्षीचा आदर्श शिक्षक सन्मान देऊन जाधव सरांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे निमंत्रित सदस्य सोमेश्वर वाघमोडे,सरपंच तृप्तीताई वाघमोडे,रेखाताई मरगळ मुख्याध्यापिका भोसले मॕडम,दत्तात्रय माने,भिमराव शेळके,गुळवे काका,कैलास गोटे उपस्थित हो.

