ग्राम शहर विकास उपक्रमा अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ३१ / सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ,राष्ट्रीय सेवा योजना ,आजादी का अमृत महोत्सव युवकांचा ध्यास - ग्राम शहर विकास उपक्रमांतर्गत विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालय तसेच अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांच्या वतीने दि .२५ जानेवारी ते ३१ जानेवारी रोजी डोंगरगण येथे करण्यात आले .
या राष्ट्रीय सेवा योजनेत ग्रामस्वच्छता ,बाल-विवाह प्रतिबंध अभियान , विविध कायद्यांविषयक जनजागृती , नवमतदार जागृती अभियान , लिंगभाव संवेदनशीलता जागृती , महिलांचे कायदेविषयक हक्क ,झिरो बजट शेती बद्दल माहिती , युवकांच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल जागृती आदी उपक्रम राबविण्यात आले .
या उपक्रमाचा समारोप समारंभ मंगळवार दि . ३१ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११:०० वा. करण्यात आला . सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले . तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक शुभांगी बाबर ,योगिता कडनर आणि विक्रम वैद्य यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी श्री .संजयजी जोशी मानद सचिव, हिंद सेवा मंडळ , अॅड. वसंतरावजी कापरे
सदस्य कार्यकारी मंडळ अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज , अॅड. अनंतजी फडणीस कार्याध्यक्ष हिंद सेवा मंडळ, श्री . सुमतीलालजी कोठारी चेअरमन पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालय सदस्य स्थानिक व्यवस्थापन समिती , श्री .दीपकजी दरे सदस्य कार्यकारी मंडळ, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज ,
सौ. ज्योतीताई कुलकर्णी सदस्य पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती , डॉ. माहेश्वरी गावित प्राचार्य पेमराज सारडा महाविद्यालय , प्रा . एम एम तांबे प्राचार्य न्यू लॉ कॉलेज अहमदनगर , प्रा . मंगला भोसले उपप्राचार्य पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालय ,
सौ .वैशाली सर्जेराव मते सरपंच डोंगरगण ,
श्री .संतोष भागूजी पठारे उपसरपंच ,श्री. किशोर काळे , प्रा . अशोक घोरपडे राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक अहमदनगर , प्रा . गणेश निमसे विभाग प्रमुख , श्री .सर्जेराव मते ग्रामपंचायत सदस्य डोंगरगण आदी मान्यवर आणि सर्व सन्माननीय विद्यार्थी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गिरीश हिरडे यांनी केले . मान्यवरांचे स्वागत प्रा. एम एम तांबे प्राचार्य न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ .सुप्रभा कुलकर्णी यांनी केले .

