अजीजभाई शेख..
राहाता - सविस्तर वृत्त असे, राहाता तालुक्यातील गुरुकुलनगर, साकुरी येथील रहिवासी परसराम नारायण सुद्दाला यांची राहाता शहरात चितळीरोड,सावता मेडीकल शेजारी सरकार मान्य देशी दारुचे दुकान आहे.या दुकानात देशी दारु किरकोळ विक्री करण्यासाठी नवनाथ मधुकर तांबे वय ४३ वर्षे हल्ली मुक्काम कोतेवस्ती, शिर्डी.तालुका राहाता.मुळ राहणार सप्तशृंगी बंगलो संत जनार्दन स्वामी नगर,आडगाव नाका,पंचवटी नाशिक.यास दिनांक ०१/०४/२०२२ पासून दुकानात देशी दारुची विक्री करण्यासाठी कामावर ठेवले होते.नवनाथ यास कामावर ठेवल्यापासून दिनांक ०९/०१/२०२३ पर्यंत त्याने दुकानातील विक्री केलेल्या देशी दारुच्या बाटल्यांचे पैसे दुकान मालकास वेळोवेळी दिले.
त्यानंतर दिनांक १०/०१/२०२३रोजी परसराम नारायण सुद्दाला यांनी नवनाथ मधुकर तांबे यास सांगितले की मी माझे मुळ गावी हैदराबाद येथे जात आहे तरी तू दुकानाचा रोजचा हिशोब माझ्या दुसऱ्या दुकानाचा कामगार कार्तीक सुरगोणी यांच्या कडे देत जा असे सांगून ते हैदराबादला निघुन गेले.त्यानंतर दिनांक २७/०१/२०२३रोजी ते हैदराबाद येथुन राहाता शहरातील त्यांच्या दुकानात आले असता, दुकानास कुलुप आढळून आल्याने त्यांनी कामगार नवनाथ मधुकर तांबे यास दुकान उघडण्यासाठी फोन काॅल केला परंतु त्याने काॅल घेतला नाही नंतर त्यांनी दुकानाचे कुलुप उघडून दुकानातील माल पाहिला असता दिनांक १०/०१/२०२३ते दिनांक २५/०१/२०२३ या दरम्यानच्या काळात देशी दारुच्या १८०मिली.ची बाटली नग १९०२ प्रती नग ७०रुपये प्रमाणे किंमत १३३१४० रुपये व ९०मिली.ची बाटली नग ६८०प्रती नग ३५रुपये प्रमाणे किंमत २३८०० रुपये असे एकूण १५६९४० रुपये किंमतीच्या मालाची विक्री करुन सदरची रोख रक्कम परसराम नारायण सुद्दाला यांनी सांगितल्याप्रमाणे कार्तीक सुरगोणी यांना न देता नवनाथ मधुकर तांबे याने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरुन नेल्याचे निदर्शनास आल्याने परसराम नारायण सुद्दाला यांनी दिनांक २८/०१/२०२३ रोजी १०/१५वाजता राहाता पोलीसांत फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस स्टेशनचे अंमलदार सफौ/डी.डी.तुपे यांनी आरोपी नवनाथ मधुकर तांबे याच्या विरोधात गुन्हा रजि.नं.५२/२०२३भा.द.वि.कलम ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास राहाता पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार श्री डी.डी.तुपे करीत आहे...

