शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
आज दिनांक 1/1/ 2023 रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी अहमदनगर येथील श्री राधाकिसनजी देवढे साहेब यांनी सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी येथे सदिच्छा भेट देऊ विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा स्तरीय कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यालयाचे सेक्रेटरी सुनीलजी शिवनाथ कवडे सर यांनी विद्यालयाच्या कार्याविषयी माहिती सांगितली तसेच विद्यालयाच्या वतीने साहेबांचे आभार मानले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते .

