shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुल ढेंबरे यांचे संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन तसेच साकुर पठारभागातील खड्डेमुक्तीसाठी २३ जानेवारी २०२३ पासुन साकुर पठार भागातील जनतेसह आमरण उपोषण...!

अधिकार्यांनो आता आश्वासन नको...रस्ते खड्डेमुक्त हवेत!

निष्क्रिय अधिकार्यांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था-शिवश्री- राहुल ढेंबरे पाटील

संगमनेर (प्रतिनिधी):- साकुर पठारभागातील खड्डेमय रस्त्यांसाठी वेळोवेळी पाठपुरावा, व्रुक्षलागवड आंदोलन, साकुर पठारभागातील जनतेच्या वतीने जाहीर नागरी सत्कार केल्याऩंतर देखील रस्ते खड्डेमुक्त झालेले नाहीत.
अधिकारी जनसामान्यांच्या भावनांशी खेळण्याचे काम करत आहेत.

१) साकुर ते बिरेवाडी फाटा(जि.प.सां.बा)-
०२किमी रस्ता देखभाल दुरुस्ती अभावी खड्डेमय,
०१ किमी रस्त्याचे उद्घाटन झाले पण अजुन कामाला मुहुर्त मिळाला नाही... संपुर्ण रस्ताच खड्डेमय, ०१ डिसेंबर २०२२ च्या जाहिर सत्कार व धरणे आंदोलन वेळी आठ दिवसांत काम सुरू करण्याचा जि.प.सा.बां. उप अभियंत्यांना विसर.२) मा़ंडवे खु. ते वरवंडी व साकुर ते मांडवे बु(लिंबफाटा)(सार्वजनिक बांधकाम विभाग) मागील १वर्षांपासुन ११कि.मी.चे फक्त अर्धवट निक्रुष्ठ साईड पट्ट्यांचे काम पुर्ण असा अहवाल पुढील काम पुर्णपणे खड्ड्यात.
३) रणखांब फाटा ते वरवंडी (कोणताही विभाग जबाबदारी घेत नाही.)प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत २००९ ला रोड झाल्यानंतर २०१९ पर्यंत त्यांच्या विभागाकडे २०२१ला जि.प.सा.बां.कडे वर्ग पण अधिकार्यांकडे अधिकृत माहिती उपलब्ध नाही.आता मुख्यमंत्री ग्रामसडक/सार्वजनिक बांधकाम कडे फक्त तोंडी... अधिकृत कागदपत्रे नाहीत.

तरी संबंधित विभागाने साकुरपठारभागतील खड्डेमय रस्त्यांसाठी जबाबदार अधिकार्यांचे निलंबन व तातडीने रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्यात यावी, यासाठी दि.२३/०१/२०२३  रोजी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील तसेच साकुर पठारभागातील जनतेसह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे संबंधित विभाग, आमदार, खासदार, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
close