shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडांबे खुर्द येथील ५ के.व्ही.उपकेंद्राची माजी ऊर्जा राज्यमंत्र्यांकडून पाहणी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
मंगळवार दिनांक ३१ जानेवारी २०२३

खडांबे खुर्द येथील ५ के.व्ही.उपकेंद्राची माजी ऊर्जा राज्यमंत्र्यांकडून पाहणी..!!
कै धोंडीभाऊ सोनवणे आपल्यात असायला हवे होते असे भावपूर्ण उदगार..!!

राहुरी  : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तालुक्यातील विजेचे प्रश्न मार्गी लावताना पायाभूत सुविधाची कामे ऊर्जा राज्यमंत्री कामे मंजूर केली होती त्यापैकी आज खडांबे खुर्द येथील 5 केव्हीचे उपवीज केंद्राचे काम पूर्ण होत असून त्याचा खडांबे खुर्द बुद्रुक, धामोरी, खुर्द बुद्रुक,सडे ह्या गावातील शेतकऱ्यांचे दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार असल्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी सांगितले.

      आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी आज खडांबे खुर्द येथील पूर्ण होत असलेल्या 5 एमव्हीए वीज उपकेंद्राची पाहणी करताना त्यांचे समवेत अमोल हरीश्चद्रे मयूर शेळके गणेश हरिश्चंद्रे, भिमराज हरीश्चंद्रे,शंकर हरीश्चंद्रे आदि उपस्थित होते.
तालुक्यातील खडांबे खुर्द येथे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेल्या 5कोटी 35 लाख रुपये खर्चाच्या 5 एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्रा साठी 30 मार्च 2022रोजी जमीन हस्तातर करून या कामाचे भूमिपूजन 15 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले होते.ते काम आज पूर्ण होत आल्याचे समाधान होत असल्याचे सांगून श्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की पंचायत समितीचे माजी उपसभापती कै धोंडीभाऊ सोनवणे ह्यांची अनेक वर्षाची मागणी होती की खडांबे खुर्द खडांबे बुद्रुक, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, सडे वांबोरी परिसरातील काही भागातील विजेचा जो मोठा प्रश्न आहे तो मार्गी लागण्या साठी या भागात कोठे तरी एक सब स्टेशन असावे ही मागणी आमदार झाल्यानंतर हा प्रश्न निश्चित मार्गी हा शब्द दिला होता. सुदैवाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले व त्या सरकारमध्ये मला ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत मी त्यावेळी तालुक्यात 5 विद्युत उप केंद्र मंजूर करून घेतले. त्या 5 केंद्रातीलच हे खडांबे खुर्द येथील विद्युत वीज उप केंद्र आहे.सदर 5 कोटी 35 लाख रुपये खर्चाच्या 5 एमव्हीए उप केंद्राचे काम पूर्ण होत असून आज खऱ्या अर्थाने कै धोंडीभाऊ सोनवणे हयांचे जे स्वप्न होते ते प्रत्यक्षात साकार होत असल्याचा मनस्वी खूप आनंद होत असून हे पाहायला स्वतः कै धोंडीभाऊ सोनवणे आपल्यात असायला हवे होते असे भावपूर्ण उदगार श्री तनपुरे ह्यांनी पाहणी करताना व्यक्त केले.या विद्युत उप केंद्राचा फायदा खडांबे खुर्द खडांबे बुद्रुक धामोरी खुर्द व धामोरी बुद्रुक सडे ह्या गावांमधील शेतकऱ्यांना निश्चित होणार असून त्यांचा विजेच्या दाबाचा जो प्रश्न होता तो ह्यामुळे मार्गी लागून पूर्ण दाबाने वीज मिळण्यासाठी होणार आहे.

त्याबरोबर वांबोरी व बाभुळगाव येथील वीज उप केंद्राच्या येणाऱ्या गावांना त्याचा लाभ होणार असून काही दिवसापूर्वी वांबोरी उप केंद्रातून कात्रड व गुंजाळे ह्या गावातील विजेचा प्रश्न सुटण्यासाठी नवीन लिंक लाईन टाकली होती त्या 2 ते 3 गावांना सुद्धा ह्या उप केंद्राचा फायदा होणार असल्याचे सांगत श्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की ऊर्जा राज्यमंत्री असताना ज्या कामांची मुहूर्तमेढ रोवली ती कामे आज पूर्ण होत आहे. 

या निमित्ताने मतदार संघातील विजेचे प्रश्न पायाभूत सुविधा मार्गी लागल्या आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close