शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
सिद्धी पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट श्रीरामपूर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊन ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदवला तसेच तिरंग्याला सलामी दिली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी महापुरुषांना आणि शहिदांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या पावन बलिदानास स्मृती सुमन अर्पण केले. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व करून तसेच देशभक्तीपर गीत गावून आपले राष्ट्रावरचे प्रेम व्यक्त केले आणि राष्ट्राचे लोकशाहीत्व आणि धर्मनिरपेक्षत्व जपण्याची प्रतिज्ञा केली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रेल्वे स्टेशन जवळील स्मारकास भेट देऊन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन केले. आणि तेथे भीमशक्ती सामाजिक संघटना आणि सिद्धी पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक नागरीकांनी रक्तगट तपासणी शिबिरात सहभाग घेतला. असे कार्यक्रम भविष्यातही घेण्यात येतील असे आवाहन सिद्धी पॅरामेडीकल इन्स्टिट्यूट च्या वतीने डॉ. प्रिती कुंकुलोळ यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. हरीष लुंकड, प्रा. दिलीप गालफाडे, प्राजक्ता जाधव, जुनेद शेख, सिद्धी लुंकड तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

