महसूल आधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने जमीनी गिळंकृत करत असल्याचा आरोप.
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहरातील विश्रामगृहात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन विकास मोर्चाचे सर्वेसर्वा बाबुराव पोटभरे यांनी केज शहरातील गायरान जमीनी महसूल प्रशासनाला हाताशी धरून कोट्यवधी रूपयाचा गैरव्यवहार झाला असून यात खुप मोठ मोठे मासे अडकले असुन त्यांचा विरोधात लवकरात लवकर केज मध्ये मोठ्या स्वरूपाचे अंदोलन करून पर्दाफाश करणार असल्याची गर्जना बाबुराव पोटभरे यांनी केली आहे .
यामुळे केज शहरातील मुख्य माफियांचे धाबे दणाणले आहे. केज तालुका हा भष्टाचाराचा केंद्र बिंदु झाला असुन केज तालुक्यातील प्रत्येक कार्यालय भ्रष्टाचाराने माखलेले आहे.दर्गा व मंदिराच्या जागा प्लॉट काढून परस्पर विकल्या जात आहेत. त्या पण नगर रचना कार किंवा होम टाऊन ची परमिशन न घेता. हे सगळे थांबवायचे असेल तर केज मध्ये एक मोठे अंदोलन करण्याची गरज आहे. आमच्या बहुजन विकास मोर्च्याच्या नेतृत्वाखाली लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच बेलगाव- केळगाव येथील माजी संरपचाने 20 कोटी चा वेगवेगळ्या निधीतून आलेला निधी काम न करता खालला आहे.
याचा लवकरच महाराष्ट्राच्या मुख्य आयुक्तताला भेट घेऊन पुर्ण पुरावे देऊन कारवाई करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात लवकरच आंदोलनाची तारीख कळवणार असल्याचे बाबुराव पोटभरे यांनी सांगीतले . वरील पत्रकार परिषदेला बाबुराव पोटभरे यांचे केज मधिल कट्टर कार्यक्रते लखन हजारे, कचरू तात्या खळगे, श्रीहरी मोरे,आशोक गायकवाड, सुमेध बप्पा शिंदे, मनोज कदम सह बहुसंख्य कार्यक्रते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


