अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे - कौठळीत उपस्थित कार्यकर्त्यांन पुढे व्यक्त करून दाखवली आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपली भावना.
इंदापूर प्रतिनिधी: एवढं काम करून टीका टिप्पणी आरोप झाल्यानंतर संध्याकाळी झोपल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किती त्रास होत असेल याचा पण कधी आपण विचार केला पाहिजे.अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. अशा शब्दात माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी कौठळी येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना आपली भावना उपस्थित कार्यकर्त्यांन पुढे व्यक्त करून दाखवली.
यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, पुणे जि. प. आरोग्य व बांधकाम विभाग माजी सभापती प्रवीण माने, माजी.जि. प .सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले ,सचिन सपकळ, दत्तामामा घोगरे,
अतुल झगडे, अमोल भिसे, सतीश पांढरे, बापूराव शेंडे, सागर मिसाळ, नानासाहेब नरोटे, संदेश देवकर ,शुभम निंबाळकर ,सचिन खामगळ, छायाताई पडसळकर, रेहना मुलानी, हमा पाटील, वसंत मारकड, सरपंच राणीताई मारकड, उपसरपंच सुनील खामगळ, हिरामण मारकड, सुभाष पिसाळ व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यावेळी बोलताना म्हणाले की , कौठळी गावात पोरगी द्यायची व पोरगी करायची अवघड विषय होता. रस्ते व विकासाची कामे कोणामुळे करू शकलो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केलं. मंत्री केलं. आज मी जरी काम करीत असलो तरी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे करू शकलो. पवार साहेब , अजित दादा पवार, सुप्रियाताई सुळे यांनी पाठिंबा दिल्यामुळे करू शकलो. शेवटी एकटा माणूस काही करू शकत नाही. तुमच सहकार्य, तुमच्या सर्वांची मदत असल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला काम करताना खूप बरं वाटतं. तुम्हाला माहित आहे पवार साहेबांची शिकवण आहे की,निवडणुकीपुरतं राजकारण, एकदा निवडणूक संपल्यानंतर राजकारणाचे जोडे बाजूला ठेवत सामान्य गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्यांक माणसाला कशी मदत करता येईल. सहकार्य करता येईल ही शिकवण पवार साहेबांची असल्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्या ंनी खासदार म्हणून ताई ,मी असेल जेणेकरून प्रत्येक गावात वाडी वस्तीवर काम करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला.
काम करूनही काही मंडळी कामाला नाव ठेवतात, काही आपल्यावरती टीका करतात, रस्त्याच्या बाबतीत कुठेतरी एखाद्या झेडपीतला रस्ता दाखवतात. जी माणसे व्हिडिओ काढतात. जी माणसं टीका करतात. त्यांना एकच म्हणा" ये म्हणावं आणि कौठाळीतली रस्ते बघ म्हणावं "एवढं काम करून टीका टिप्पणी आरोप झाल्यानंतर संध्याकाळी झोपल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किती त्रास होत असेल याचा पण कधी आपण विचार केला पाहिजे. अशा लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. अशा लोकांना सांगितलं पाहिजे. निवडणुकीपुरतं यायचं आणि गोड गोड बोलायचं. पाठीवर शाब्बासकीची थाप टाकायची, तुझ्या घरी चहाला जेवायला यायचं असं म्हणून प्रश्न सुटत नसतात. अशाने कामे होत नसतात. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात बाबांनो. आज तुमच्या गावामध्ये उद्घाटन केली. पूर्वी तुमच्या गावात काय होतं २०१२ अगोदर तुमच्या गावाची काय परिस्थिती होती. तुम्ही शांतपणे डोक्याने विचार करा. आज येथे का मला आनंद आहे .राष्ट्रवादीची दोन्हीही गट आज समोर दिसतात. नक्की झोपताना समाधान वाटल अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

