आत्ता एकल महिला नाही. ती माऊली महिला आहे- खासदार सुप्रियाताई सुळे .
इंदापूर मधून आता सामाजिक परिवर्तनाची सुरुवात.
इंदापूर प्रतिनिधी: आजही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात आपण एकल महिलेपासून सुरुवात केली.
आत्ता ज्या सगळ्या आमच्या एकल भगिनी आहेत. त्यांना मी माऊली म्हणते. अशा माऊली पासून आपल्या भागात इंदापूर मधून आता सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होत आहे. आणि आत्ता एकल महिला नाही. ती माऊली महिला आहे. अशा शब्दात कौठळी येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडल्यानंतर यावेळी सभेत उपस्थितांना संबोधित करताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जि. प. आरोग्य व बांधकाम विभाग माजी सभापती प्रवीण माने, माजी.जि. प .सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले ,सचिन सपकळ, दत्तामामा घोगरे,
अतुल झगडे, अमोल भिसे, सतीश पांढरे, बापूराव शेंडे, सागर मिसाळ, नानासाहेब नरोटे, संदेश देवकर ,शुभम निंबाळकर ,सचिन खामगळ, छायाताई पडसळकर, रेहना मुलानी, हमा पाटील, वसंत मारकड, सरपंच राणीताई मारकड, उपसरपंच सुनील खामगळ, हिरामण मारकड, सुभाष पिसाळ व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या भाषणात बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आजही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमात आपण एकल महिलेपासून सुरुवात केली. काम होत राहतील विकास होत राहतील. पण जोपर्यंत समाजात सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत या भागाचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणता येणार नाही.इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष छायाताई पडळकर यांच्या बाबतीत बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, या ताई त्यांचे मालक यांना कोविडमध्ये गमावलं म्हणून त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखात ताई तुमचे वेगळे स्थान आमच्या सगळ्यांच्या मनात आहे. म्हणून आयोजकाचे व व्यासपीठावरील सर्व महिलांचे मनःपूर्वक आभार मानते व कौतुक करते की, अंधश्रद्धेतून श्रद्धे कडे येत आहात. आत्ता ज्या सगळ्या आमच्या एकल भगिनी आहेत. त्यांना मी माऊली म्हणते. अशा माऊली पासून आपल्या भागात इंदापूर मधून आता सामाजिक परिवर्तनाची सुरुवात होत आहे. आणि आत्ता एकल महिला नाही. ती माऊली महिला आहे. तिने मला कुंकू लावलं आणि मी तिला कुंकू लावलं. आपण तिळगुळाचा कार्यक्रम आणि मकर संक्रातीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू करतोय. त्याबद्दल सगळ्या उपस्थित महिलांचे मनःपूर्वक आभार मानते. कारण हा खूप मोठा बदल करण्याचा प्रयत्न करतोय आपण. अनेक वेळा नको ताई, नको लावू मी त्यांना म्हणते "असं नाही, नवरा असताना कुंकू लावता. त्याचे आयुष्यभर आठवण काढता ना मग, त्याच्या नावाने कुंकू लावलच पाहिजे " त्यामुळे त्या महिलेलाही मोकळा श्वास घेण्याचा अधिकार असलाच पाहिजे. ते शकुन अपशकून नसतं म्हणून मी त्यांना म्हणते की तुम्हाला मी कुंकू लावायच्या आधी तुम्ही मला कुंकू लावा. तुम्ही मला कुंकू लावल्यानंतर मी तुमची ओटी भरणार. कारण का आपल्याला ही कुठेतरी मोडायचे आहे. कदाचित तो काळ वेगळा होता. गरजा वेगळ्या होत्या. त्याच्यामुळे त्या पद्धतीने प्रथा महिलांसाठी ती चौकट ते बरोबर योग्य ते म्हणत नाही परंतु तो काळ होता. काळाबरोबर आपण सगळ्यांनी बदललं पाहिजे. शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे. आज आपण सायन्स चा विचार केला पाहिजे. आणि तो बदल इंदापूर मध्ये होतोय याचा सार्थ अभिमान आहे . मामा तुम्ही जे कष्ट करताय ते खरंच समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतंय. माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही प्रथा प्रथम कोल्हापूर मधील शाहू महाराजांच्या कोल्हापूर मध्ये झाली. आणि ती मुश्रीफ साहेबांनी तो नियम केलेला आहे. याबाबतीत आपल्या राज्यामध्ये ते ग्रामविकास मंत्री असताना सगळ्या ग्रामपंचायतींना विनंती केली की, आज नंतर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महिला तिचा नवरा गेला तर तिला कुंकू लावून नको ह्या ज्या पद्धती आहेत त्या रूढ पद्धती आहेत .त्या थांबल्या पाहिजेत म्हणून मुश्रीफ साहेबांनी तुमच्या आणि माझ्यासाठी घेतला हा खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. सामाजिक परिवर्तन करताना सोपं नसतं कदाचित पटतं .काही लोकांना पटत नाही. एक काळ असा होता ब्युटी पार्लरमध्ये जाणे हे वाईट मानत होते.परंतु आपल्या भागातल्या मुलींनी त्याचा कोर्स घेऊन त्यांना सर्टिफिकेट देऊन सन्मान आज आपण करतोय. एवढा मोठा सामाजिक परिवर्तन झालं आणि ब्युटी पार्लर चालवणं खूप मोठी गोष्ट आहे. समतेची भाषा ही शिक्षणामुळे येते.

