एमआयडीसी त उद्योग आणण्याचे काम सुप्रियाताई सुळे व दत्तात्रय भरणे यांनी केले- पुणे जि. प. आरोग्य व बांधकाम विभाग माजी सभापती प्रवीण माने.
इंदापूर प्रतिनिधी:एमआयडीसी त उद्योग आणण्याचे काम सुप्रियाताई सुळे व दत्तात्रय भरणे यांनी केले असे ग्रामपंचायत कौठळी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाला यावेळी प्रदीप माने यांनी प्रतिपादन केले.
यावेळी माजी.जि. प .सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले ,सचिन सपकळ, दत्तामामा घोगरे,
अतुल झगडे, अमोल भिसे, सतीश पांढरे, बापूराव शेंडे, सागर मिसाळ, नानासाहेब नरोटे, संदेश देवकर ,शुभम निंबाळकर ,सचिन खामगळ, छायाताई पडसळकर, रेहना मुलानी, हमा पाटील, वसंत मारकड, सरपंच राणीताई मारकड, उपसरपंच सुनील खामगळ, हिरामण मारकड, सुभाष पिसाळ व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रदीप माने बोलताना म्हणाले की, कौठळी गावाला दुष्काळात पवार साहेबांनी भेट दिली आणि पाणी, चारा छावण्या सुरू झाल्या. गावात आले की पवार साहेबांची आठवण होते. एमआयडीसी त उद्योग आणण्याचे काम आदरणीय सुप्रियाताई सुळे व दत्तात्रय मामा भरणे यांनी आणण्याचे काम केले. पूर्वी एमआयडीसीला नाव होते फाईव्ह स्टार परंतु कंपन्या किती होत्या ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. इंदापूर एमआयडीसी मध्ये कंपन्या आल्यामुळे येथील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी खूप मोठा फायदा या ठिकाणी झाला. व्याहळी ,कौठळी, बळपुडी, लोणी देवकर, आजूबाजूचे गावे, पळसदेव असेल काहींना नोकरी तर काहींना व्यवसाय रूम भाड्याने देत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून विकासाची कामे ताई व मामांच्या माध्यमातून झाली. त्याचबरोबर शैक्षणिक पाया मजबूत करण्याचे काम केले असे मनोगत यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले.

