डिग्री न मिळवता मॅनेजमेंट कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं हेच सगळ्यात सुंदर मॉडेल महाराष्ट्रात कुठला असेल तर ते मानेदादा - खासदार सुप्रियाताई सुळे.
इंदापूर प्रतिनिधी:डिग्री न मिळवता मॅनेजमेंट कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं हेच सगळ्यात सुंदर मॉडेल महाराष्ट्रात कुठला असेल तर ते मानेदादा अशा शब्दात शून्यातून व्यवसाय क्षेत्रात विश्व निर्माण करणारे सोनाई परिवाराचे सर्वेसर्वा दशरथ माने यांच्या कार्य कुशलतेवर अभिमानाने कौठळी येथील विविध विकास कामाचे व भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थितांना बोलताना आपल्या भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिमानास्पद मत व्यक्त केले.
यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जि. प. आरोग्य व बांधकाम विभाग माजी सभापती प्रवीण माने, माजी.जि. प .सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले ,सचिन सपकळ, दत्तामामा घोगरे,अतुल झगडे, अमोल भिसे, सतीश पांढरे, बापूराव शेंडे, सागर मिसाळ, नानासाहेब नरोटे, संदेश देवकर ,शुभम निंबाळकर ,सचिन खामगळ, छायाताई पडसळकर, रेहना मुलानी, हमा पाटील, वसंत मारकड, सरपंच राणीताई मारकड, उपसरपंच सुनील खामगळ, हिरामण मारकड, सुभाष पिसाळ व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभाप्रसंगी युवकांच्या रोजगारासंदर्भात बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, आज दिवसभरात इंदापूरला रस्ता मागत नाहीत पाणी मागत नाहीत, कोणी काही मागत नाही तर मला फक्त एक गोष्ट मागतात ती म्हणजे नोकरी. आज या भागातल्या युवकांना नोकरी पाहिजे. मला चांगली बातमी द्यायची आहे .आज दत्तात्रय भरणे मामा आणि मी एमआयडीसी मध्ये गेलो कोविडमध्ये सगळे बंद असताना दशरथ दादा माने व प्रवीण माने कुटुंबीयांनी एवढी सुंदर तेलाची फॅक्टरी टाकली आहे आणि सोयाबीन पासून काय प्रॉडक्ट बनतात त्याची अप्रतिम फॅक्टरी झाली आहे. हजारो लोकांना सोनाईच्या या व्यवसायामुळे अप्रतिम संधी मिळाली आहे. मला याचा अभिमान वाटतो. जेव्हा मी मुंबई, पुणे, औरंगाबाद, राज्यात फिरते. कुठल्याही मार्ट मध्ये गेले तर बाकीचं सोडा सोनाई चे प्रॉडक्ट दाखवा. १२५ प्रॉडक्ट काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे असतात. अंबानी यांना भेटले तर त्यांना सांगेन आमच्या सोनाई आमच्या इंदापूरचे प्रॉडक्ट तुमच्या घरात आहेत. आज आनंद एका गोष्टीचा अभिमान वाटतो की, सोनाईच कौतुकच आहे. त्याचबरोबर सोनाई प्रॉडक्ट मुळे लाखो कुटुंबांना आधार मिळतो. याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. शून्यातून माने दादांनी व्यवसाय उभा केला आहे. माने दादांना इंग्रजी येत नसूनही फॉरेन मध्ये जाऊन फॉरेनर यांना त्यांचे प्रॉडक्ट विकून येतात. इंग्रजी त्यांना येत नाही. मी तर दादांना सांगितलं तुम्ही एमबीए केलं नाही पण तुम्ही मॅनेजमेंट स्कूल मधील विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे की, डिग्री न मिळवता मॅनेजमेंट कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं हेच सगळ्यात सुंदर मॉडेल महाराष्ट्रात कुठला असेल तर ते माने दादा आहेत. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सहा हजार कामगार मदतीला आहेत. सप्लायर, ट्रकवाला, चीलिंग सेंटरवाला, विक्रेता, एजन्सीवाला, यांचा हिशोब करता देशात दहा लाख लोकांना आपल्यामुळे रोजगार मिळाला तर विचार करा आपल्या इंदापूर मध्ये या देशात दहा लाख लोकांना रोजगाराची संधी मिळते. यापेक्षा चांगला आनंद काय आहे . तुम्ही सांगा अशा शब्दात त्यांनी मत व्यक्त केले

