वर्षा दोन वर्षात इंदापूर भागातला कुठलाही रस्ता, कुठलेही ड्रेनेज हे केल्याशिवाय राहणार नाही - आमदार दत्तात्रय भरणे.
इंदापूर येथील बाब्रस मळा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: दि. ६ जानेवारी २०२३ इंदापूर येथील बाब्रस मळा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन रक्कम (अंदाजे १.५ कोटी) समारंभ माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस ,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, वसंत माळुंजकर,माजी नगराध्यक्ष सुरेश गवळी, ,माजी नगरसेवक विनायक बाब्रस, माळवाडी चे राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब व्यवहारे, माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, एकनाथराव गारदी, निखिल सेठ बाब्रस, पोपटराव जगताप, दत्तामामा घोगरे, अजित शेंडगे, प्रशांत शिंदे, अहमदराजा सय्यद, किसन शेंडे, बाळू म्हेत्रे, संजय शिंदे, सौरभ शिंदे, अनिकेत वाघ, गजानन गवळी, अमर गाडे, हरिदास हराळे , स्वप्निल मखरे, सुभाष खरे सर ,रामदास चौगुले, मनोज पवार ,सचिन चौगुले, गणपत गवळी इत्यादी उपस्थित होते .
या कार्यक्रमास सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांनी भेट दिली.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मनोज भापकर ,अनिल चव्हाण ,समीर दुधनकर, रमेश बनसोडे, बापू भिसे, संतोष काळे, प्रवीण शिंदे इत्यादींनी केले. तर प्रस्ताविक माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी केले. सूत्रसंचालन मोहिते सर यांनी केले. कार्यक्रमासाठी बाब्रस मळा येथील महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या तालुक्याचा आमदार काही दिवस राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कुठलेही पद मिळाले हे शायनिंग करण्यासाठी नसते तर त्या पदाचा उपयोग गोरगरीब माणसासाठी किती होतो यावरून त्याची किंमत पारख केली जाते. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने सांगतो आजही आमदार म्हणून माझे कर्तव्य आहे. आमदार हा तालुक्याचा प्रमुख असतो . आमदार म्हणून असेल माझ्याकडून आपल्या सर्वांना देता येईल लोकांची काम प्रामाणिकपणे करता येईल तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून एवढ्यावर थांबायचं नाही. आपल्याला इंदापूर शहर बदलायचे आहे. कुठेतरी राजकारण कुठेतरी पुढे पुढे करून नारळ फोडून करायचं नाही .तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची साथ आशीर्वाद असले की, आमची जबाबदारी वाढते. या लोकांनी ज्या विश्वासानी या खुर्चीवर बसवले. या खुर्चीचा उपयोग तुमच्या कल्याणासाठी केला पाहिजे. आमच्या महिला भगिनींचे जे काय प्रश्न आहेत. या भागातल्या असतील. आजही सांगतो वर्षा दोन वर्षात इंदापूर भागातला कुठलाही रस्ता, कुठलेही ड्रेनेज हे केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हा सर्वांना देतो. सरकार वरचं कुठलंही असू द्या आपण काम करूया अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

