shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपल्याकडून एखाद्याला दुःख होईल असे वागू नका, सहकार्य करता येईल तेवढे करा - दत्तात्रय भरणे .

आपल्याकडून एखाद्याला दुःख होईल असे वागू नका,  सहकार्य करता येईल तेवढे करा - दत्तात्रय भरणे .

अंथूर्णे येथे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन अंथूर्णे  गावात केले असून आज दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांनी या शिबिरातील सांस्कृतिक कार्यक्रमास भेट दिली. यावेळी या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन भरणे यांच्या हस्ते पार पडले.

 यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य सचिन सपकळ , इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे सचिव वीरसिंह रणसिंग तसेच विद्यालयाचे प्राचार्य डॉ.रांकुश आहेर ,उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे, छत्रपती हायस्कूलचे प्राचार्य शिवाजी दळवी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. रामचंद्र पाखरे, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी राजेंद्र कुमार डांगे, सरपंच लाला खरात,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, विशेष श्रमसंस्कार शिबिर आज येथे आयोजित केलेले आहे. संस्कार हे अनुभवातूनच मिळतात. शिबिरामुळे आपण घराबाहेर पडतो. त्यावेळी अनेक चांगले मित्र मिळतात.  आयुष्यभराची जिवाभावाची मित्रमंडळी यातून मिळतात. शिबिरातून ग्राम स्वच्छता कशी करायची.  स्वच्छतेचे महत्व अनुभवास मिळते. त्याचा उपयोग तुम्ही मोठे झाल्यावर किंवा जबाबदार अधिकारी हॉल तेव्हा त्याचा उपयोग तुम्हाला होईल. पर्यावरणामध्ये वृक्षारोपण कसे करायचे , रस्ता सुरक्षा, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि आपल्या गटांमध्ये चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, ग्रामस्थांच्या भेटी यामध्ये आपण गरीबाच्या झोपडीतही जाऊन भेटी द्या त्यांचे दुःख जाणून घ्या.  आयुष्यात सुखाचा आणि दुःखाचा   अनुभव शिकायला मिळेल. आपल्याकडून एखाद्याला दुःख होईल असे वागू नका, आयुष्यात  जेवढे सहकार्य करता येईल तेवढे करा. तुमच्या आई वडील नातेवाईक यांच्या तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करा. संस्कार शिबिराचा आपल्या आयुष्यात उपयोग करायचा असतो .कष्ट केले पाहिजे त्याबरोबर खेळ खेळले पाहिजे अशा शब्दात त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपले मत व्यक्त केले .

याप्रसंगी वीरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालयासाठी  आमदार दत्तात्रय भरणे यांची योगदान असल्याचेही स्पष्ट करीत भरणे यांचे आभार मानले.

याप्रसंगी दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून सांस्कृतिक कार्यक्रमाचा काही वेळ आनंद घेतला.
close