प्रतिनिधी : संजय वायकर
पूणे : ७ / महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन ने बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथि निमित्त " आयकॉनिक ब्रँड ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड चे आयोजन केले होते ह्या सोहळ्यात नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला सन्मानित करण्यात आले. संस्थेतर्फे संकुल संचालकश्री सागर सुके व एमबीए कॉलेजचे संचालक डॉ तानाजी दबडे ह्यांनी ह्या पुरस्कराचा स्वीकार केला.
हा समारंभ हिंदू हृदय सम्राट शिवसेना संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त आदरांजली स्वरूप मुंबई मधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मध्ये आयोजित करण्यात आला होता.
या समारंभामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माहासेवाचे अध्यक्ष रमेश प्रभू आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. महासेवेचे उपाध्यक्ष व प्रवक्ते सुनील शर्मा यांनी प्रथम सांगितले हा पुरस्कार सोहळा स्वतःमध्येच अनोखा आहे कारण मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामांचे प्रदर्शन करण्यासाठी हे पुरस्कार देण्यात येतात. पत्रकारिता, राजकारण, समाजसेवा, चित्रपट टीव्ही, व्यवसाय, आरटीआय आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्तींना ह्यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

