shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री .आर. के .शहा विद्यालय येथे आनंद बाजार उत्साहात.

श्री .आर. के .शहा विद्यालय येथे आनंद बाजार उत्साहात.
इंदापूर प्रतिनिधी: आज दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित श्री. आर. के. शहा विद्यालय इंदापूर येथे बाल आनंद बाजार उत्साहात पार पडला या आनंद बाजाराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. गिरीश शहा  यांच्या हस्ते करण्यात आले.
 या कार्यक्रमासाठी माजी केंद्रप्रमुख सौ. कदम मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या
मुलांना दैनंदिन ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञानात भर पडण्याच्या हेतूने आनंद बाजाराचे आयोजन शाळेत करण्यात आले यामुळे मुले खूप खुश झाली त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता त्यांनी आज विविध प्रकारचे स्टॉल लावून मनसोक्त खरेदीचा व विक्रीचा आनंद घेतला मुलांनी विविध प्रकारच्या रानभाज्या , फळभाज्या , पालेभाज्या तसेच खाऊ गल्लीमध्ये विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानीच होती परिसरातील पालकांनी भरघोस प्रतिसाद देत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्यांच्या शाळेत येण्यामुळे मुले खूप आनंदी दिसत होती
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक ,पालक विद्यार्थी, व शिक्षक सहभागी झाले.
close