shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महारुद्र पाटील यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने पक्षाला मोठी ताकद - जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे

महारुद्र पाटील यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने पक्षाला मोठी ताकद -  जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे.
इंदापूर प्रतिनिधी:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे इंदापूर तालुक्यात आगामी काळात तिसरी शक्ती उदयास येईल तसेच अनेक मोठे नेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २०२४ मध्ये प्रतिष्ठेची होणार आहे असे बाळासाहेबांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत  म्हणाले.
यावेळी महारुद्र पाटील, सुदर्शन साखरे, सीमा कल्याणकर, अशोक देवकर, वसंत आरडे, देविदास भोंग, सुभाष जगताप, सुरज काळे, वैभव जामदार ,बबन खराडे, अण्णा काळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी नुकताच बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आज दिनांक २८ जानेवारी रोजी इंदापूर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, लोकसभेला ज्या लोकांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार केला. तेच लोक विधानसभेला भरणे यांच्याबरोबर होते. यावरून बरेच काही स्पष्ट होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूप मोठा उद्रेक असून येणाऱ्या काळात तो बाहेर पडेल. आणि २०२४ मध्ये याचे परिणाम भोगावे लागतील. तसेच जो निवडून येईल तो आपला ' असले धंदे भरणे यांनी बंद करून कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम करावे' असा सल्लाही त्यांनी १यावेळी दिला. तसेच इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांना मानणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय केला जात आहे. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे त्यांचा स्वतंत्र गट तयार करीत आहेत. हा गट नसून कमिशन गोळा करणारी टोळी आहे असा घनाघाती आरोप महारुद्र पाटील यांनी यावेळी केला.
इंदापूर कारखान्याची निवडणूक कार्यकर्त्यासाठी लढवली पाहिजे होती जर इंदापूर कारखाना कार्यकर्त्यांच्या ताब्यात आला असता तर त्याचा चेअरमन माने दादा यांना करावे लागले असते आणि माने दादा यांना चेअरमन केल्यानंतर माने दादांनी इंदापूर कारखाना चांगला चालवला असता तर आमदारकीला आपला स्पर्धक तयार होऊ शकतो या डावपेच्यामुळे इंदापूर कारखान्याची निवडणूक दत्तात्रय भरणे यांनी गेले दोन टर्म लडले नाहीत त्यांना कोणालाही व कार्यकर्त्याला मोठं होऊ द्यायचे नाही. असाही घनाघात त्यांनी केला.
close