प्रजासत्ताक दिनी "ध्वजारोहणा" साठी निवृत्त नायब सुभेदार मा. मधुकरराव शिंदे यांची उपस्थिती.
*प्रमुख पाहुणे म्हणूनसुप्रसिद्ध कवयित्री सौ.अश्विनी चांदणे उपस्थित.
*प्रजासत्ताक दिनी छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम ठरले आकर्षण.
*छोट्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली सामूहिक कवायत अति उत्तम ठरली.
*छोट्या विद्यार्थ्यांनी ध्वजगीत सादर करणे ही एक अभिमानाची बाब ठरली.
*प्रजासत्ताक दिनी छोट्या मुलांनी निर्भीडपणे केली आपली मनोगत व्यक्त.
*प्रजासत्ताक दिनी वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला.
*प्रजासत्ताक दिनासाठी *कार्यक्रमासाठीपालकांची उपस्थिती उल्लेखनीय.
"प्रजासत्ताक दिनी पालक विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी, ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्प शंभर पुस्तकांची कवयित्री चांदणे यांच्याकडून भेट जाहीर.
*प्रजासत्ताक दिनी इंग्रजी माध्यमाचे १ ते ३ वर्ग नव्याने सुरू करण्याचे प्रशासनाच्या वतीने केली जाहीर.
*वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींकडून प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप.
भोसरी:- गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिन भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेचे शाळेत सकाळी ७:३० ते १०:३० यावेळी शाळेच्या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिन "ध्वजारोहण" सेवानिवृत्त नायब सुभेदार मा. मधुकरराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री सौ. अस्मिता चांदणे या उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी ज्ञानेश्वर सावंत, सतीश भालेराव, काळूराम बवले,अॅड मंगेशपिंगळे, निवृत्ती अमुप, श्री. कोल्हे साहेब,नारायण हट शिक्षण संस्थेचे तसेच नारायण हट गृह संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी सामूहिक कवायत, राष्ट्रभक्तीपर गीतांवर नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी मनोगते, आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाले.
प्रजासत्ताक दिनी छोट्या विद्यार्थ्यांमधून शिवश्री बनसोडे, रुपेश भुजबळ, स्वस्तिका गोळे, निशा बागुल, हर्षाली जोशी, जानवी पिंगळे, शिवन्या संत, मयन पिंगळे यांनी देशभक्तीपर मनोगते व्यक्त केली.
छोटी विद्यार्थिनी शिवन्या संत येणे देशभक्तीपर "मेरी झाशी नही दूंगी!"ही नाटिका सादर केली तिला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. "संदेशे आते है!" या देशभक्तीपर गीतावर छोट्या विद्यार्थ्यांनी केलेला नृत्याविष्कार अतिशय उत्तम पद्धतीने सादर झाला.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम देखील संपन्न झाला.
वर्षभर घेतलेल्या विविध स्पर्धा, उपक्रम, परीक्षा, खेळ, यामध्ये नाही नौपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.अस्मिता चांदणे म्हणाल्या"नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे त्रिकूट पाहावयास मिळाले. त्यांच्या एकजूटीन शाळेचे विद्यार्थ्यांचे,भवितव्य उज्वल असणार आहे हे स्पष्ट दिसून येते. पालकांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला पाहिजे अपेक्षांचे धडपण विद्यार्थ्यांनावर न ठेवता शाळा पालक यांच्या सहकार्याने चांगला नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे."त्यांनी आपल्या मनोगता नंतर शाळेसाठी १०० उपयुक्त पुस्तके शाळेच्या ग्रंथालय देण्याचे कबूल केले.
श्री.ज्ञानेश्वर सावंत, डॉ. सुयेश कुमार तारळकर, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे प्राचार्या, विजय चौगुले यांनी आपली मनोगते या प्रसंगी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजन: प्राचार्या, विजया चौगुले, मालती माने, प्रतिभा तांबे, मीनल पाटील, सायली संत, अश्विनी वायकर, सुरेखा मुके, प्रवीण भाकड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नारायण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीप बेंढुरे, सचिव, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, डॉ. सुयशकुमार तारळकर, संदीपसांगळे, मुकुंदराव आवटे, मनोज पवार, अंकुशराव गोरडे,, रोहिदास गैंद, शिवराम काळे, उज्वला थिटे, रोहिणी पवार, शोभा आरुडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: सौ. सायली संत यांनी केले. आभार: श्री .अंकुशराव गोरडे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता" वंदे मातरम!" गीताने झाली.

