प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २६ / नगर येथील सावेडी उपनगरात प्रभाग क्र.२ येथील निर्मलनगर मित्र मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त मा .नगरसेवक श्री. निखिल वारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
निखिल वारे यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. नंतर राष्ट्रगीत घेण्यात आले . भारतीय तिरंग्यास मानवंदना देण्यात आली . यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या घोषणांनी परिसर आनंदी उत्साहाने द्विगुणित झाला .
यावेळी निखिल वारे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या .शालेय विद्यार्थी ,महिला भगिनी ,ज्येष्ठ नागरिक यांचा उत्साह वाखाणण्या जोगा असल्याचे सांगितले .
सामाजिक कार्यकर्ते बंटी हिवाळे व राहुल सांगळे यांनी देशभक्तीपर भाषण करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला . तसेच डॉ .ताजवे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन देशभक्तीपर भाषण केले .प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले .
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाला संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी, संतोष काळे, सुशांत भिंगारदिवे, प्रथमेश कोल्हे ,जावेद इनामदार,साजिद इनामदार , अमित काळे , प्रथमेश गटणे, सचिन अकोलकर, दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर , भराट मावशी ,वर्षा गवळी , ज्योती पुरी , सोनाली निमसे,आहिरे मॅडम, गहिले मॅडम आदी महिला व नागरिक उपस्थित होते .

