shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांगी बु॥ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.प्रभावती लकडे बिनविरोध

शौकतभाई शेख । श्रीरामपूर :-- 
तालुक्यातील वांगी बु॥ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.प्रभावती ज्ञानेश्वर लकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वांगी बु॥ ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये माजी आ.भानुदास मुरकुटे व ससाणे गटाला सर्वच्या सर्व आठ जागा मिळाल्या होत्या. त्यात ज्ञानेश्वर आसाराम बिडगर हे सरपंचपदी निवडून आले होते. बहुमत मिळाल्याने मुरकुटे-ससाणे गटाचे उपसरपंच होणार हे निश्चित होते. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच ज्ञानेश्वर आसाराम बिडगर यांचे अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस. एम.सानप यांनी काम पाहिले, त्यांना ग्रामविकास अधिकारी शितल बाचकर यांनी सहकार्य केले. उपसरपंचपदासाठी सौ.प्रभावती लकडे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. बैठकीस स्वप्नील दत्तात्रय खेमनर, गोरख लक्ष्मण बर्डे, सौ.रंजना दामोधर कोपनर, पोपट कारभारी कांबळे, सौ.कांताबाई भाऊसाहेब पवार, सौ.मुक्ताबाई गोपीनाथ निकम हे सदस्य हजर होते. 

याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे संचालक कल्याण लकडे, सोमनाथ पारखे, माजी सरपंच जगन्नाथ बिडगर, नानासाहेब पारखे, मळू उघडे, संजय पारखे, मच्छिंद्र भिसे, अण्णासाहेब चितळकर, अशोकराव चितळकर, दत्तात्रय हळनोर, किशोर कांबळे, अतुल कांबळे, नवनाथ बिडगर, रामभाऊ बर्डे, दत्तात्रय पवार, लहानू बाचकर, दामोधर कोपनर, अण्णासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

नूतन उपसरपंच सौ.प्रभावती लकडे यांचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, अ.नगर जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, मुळा प्रवराचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ,  कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, युवक नेते निरज मुरकुटे आदींनी अभिनंदन केले आहे.
close