शौकतभाई शेख । श्रीरामपूर :-
येथील सुभाष वाघुंडे आणि सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत २०१७ पासून माऊली वृद्धाश्रम सुरु केला, या सेवाभावी जागी त्यांनी श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारले आहे, या मंदिराला भक्तीसभामंडप बांधून देणार असल्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.तर श्रीरामपूर नगर पालीकेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी वृद्धाश्रमातील वृद्धासाठी औषधोंपचारांच्या मदतनिधीची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
येथील माऊली वृद्धाश्रमात भिंगारदिवे परिवाराच्या वतीने आई,वडील स्मरणदिनानिमित्त १० खुर्च्या भेट,पाच हजार रुपयांचा चेक प्रदान,अन्नदान, मान्यवर सन्मान आणि प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार लोखंडे बोलत होते तर अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक या होत्या, त्यांनी स्व. गोविंदराव आदिक लोककल्याणकारी मदतनिधीतून औषध पुरविणार असल्याचे सांगितले. प्रमुख उपस्थिती म्हणून रा. ब. नारायणराव बोरावके महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अमरनाथ जगदाळे, सुखदेव सुकळे,प्राचार्य डॉ. गोरख बारहाते,बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक प्रा.डॉ.नानासाहेब पवार आदी व्यासपीठावर विराजमान होते. प्रारंभी स्व. हिराबाई दगडू भिंगारदिवे, स्व. दगडू विश्राम भिंगारदिवे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.सुभाष वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. डॉ. बाबुराव उपाध्ये लिखित पुस्तके, शाल आणि बुके देऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.संयोजक रावसाहेब भिंगारदिवे अण्णासाहेब भिंगारदिवे, सौ.निर्मला रावसाहेब भिंगारदिवे, सौ.सुनीता अण्णासाहेब भिंगारदिवे यांनी स्वागत करून पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सन्मान केले.माऊली वृद्धाश्रमाच्या प्रमुख सौ. कल्पनाताई वाघुंडे, शुभम नामेकर यांनी नियोजन केले. खासदार लोखंडे यांनी वाघुंडे व भिंगारदिवे परिवाराचे कौतुक केले.उपप्राचार्य डॉ.अमरनाथ जगदाळे यांनी आपल्या मनोगतातून भिंगारदिवे परिवाराने सेवेचा खरा आदर्श निर्माण केला आहे.योग्य ठिकाणी मदत केली तरच खरे मातृपितृ ऋण फिटले जातात असे सत्कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाऊसाहेब भिंगारदिवे, सौ.शारदा भिंगारदिवे, विश्वासराव गायकवाड, सौ. सुजाता गायकवाड, विष्णू जगताप, दीपक पडघलमल, श्रीकांत भिंगारदिवे, सौ.निशा भिंगारदिवे,श्लोक भिंगारदिवे, अमोल भिंगारदिवे, सौ.अश्विनी भिंगारदिवे,दिलीप भिंगारदिवे, रोहिदास भिंगारदिवे, नंदा तोरणे, बंटी भिंगारदिवे, राजेंद्र गोरे, दत्तात्रय येवले,चंद्रकांत राठोड, कम्युम, कान्हूदास शेळके, ज्ञानेश्वर देसले, अक्षय भिंगारदिवे आदींसह वृद्धाश्रमातील मातापिता उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी भिंगारदिवे आणि वाघुंडे परिवाराचे सेवाकार्य आदर्शरूप असून वृद्धाश्रमातील मायपित्यांना आरोग्यसेवा देण्यात आपण पुढे राहू, स्व. खासदार गोविंदराव आदिक मदत फ़ंडातून सहकार्य करू असे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये मानवतेची सेवा आणि वाचन संस्कृती वाढविणे ही आजची गरज असल्याचे सांगून त्यांनी सूत्रसंचालन केले तर अण्णासाहेब भिंगारदिवे यांनी आभार मानले.

