shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'अल्पवयीन' मुलीच्या विनयभंगा प्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
मंगळवार दिनांक १७ जानेवारी २०२३

'अल्पवयीन' मुलीच्या विनयभंगा प्रकरणी आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा..!!

अहमदनगर : आरोपी नामे संतोष तुकाराम गायकवाड , वय - २७ वर्षे , रा . उक्कलगाव ता.श्रीरामपुर जि. अहमदनगर याने पिडीत फिर्यादी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा. माधुरी एच. मोरे मॅडम, अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोषी धरून भा.दं.वि. कलम ३५४ , ३५४ ( अ ) ( १ ) ( २ ) ३५४ ( ब ) नुसार दोषी धरून आरोपीस ३ वर्षे सक्त मजुरी व रूपये २,००० / - दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.
 सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी.केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले. घटनेची थोडक्यात हकीगत की, दिनांक २०.०९ .२०१५ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पिडीत मुलगी हि टी.व्ही.पाहणेसाठी आरोपीच्या आत्याच्या घरी गेली होती.

       त्यावेळी आरोपी संतोष तुकाराम गायकवाड हा एकटाच घरामध्ये होता. त्यावेळी त्याने घरात इतर कोणी नाही हे पाहून घराचा पुढील दरवाजा,लाईट व टी. व्ही बंद करून पिडीत मुलीस ओढत पाठीमागच्या अंगणात घेवून गेला व तिला मारहाण करून तिच्या अंगावरील कपडे काढले. तसेच आरोपी तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपीची चुलत बहिण तेथे आल्याने आरोपी तेथून पळून गेला. पिडीत मुलीने तिच्या आईला सदरची घटना सांगितल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने आरोपी विरुध्द राहुरी पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दिली. घटनेचा संपूर्ण तपास पी.एस. आय. महावीर जाधव यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले.

          यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी,पिडीतेची आई, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वयासंदर्भात मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच आरोपी तर्फे आरोपीच्या चुलत बहिणीची साक्ष नोंदविण्यात आली. चुलत बहिणीच्या साक्षीमध्ये चुलत आरोपीच्या वकीलांनी आरोपीने सदरचा गुन्हा केला नाही केवळ फिर्यादी व आरोपीची बहिण यांचे लहान मुलांवरून भांडण झाले. यावेळी चुलत बहिणीने आरोपीला बोलावून तुमचा बेत बघते असे बोलल्याचा राग आल्याने फिर्यादीने पिडीत मुलीस हाताशी धरून आरोपी विरुद्ध खोटी केस दाखल केले बाबत पुरावा आणण्याचा प्रयत्न केला. 

परंतु, सरकारी वकीलांनी युक्तीवादाचे वेळी मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले की , जर लहान मुलांमध्ये भांडण झाल्याची घटना झाली असती तर फिर्यादीने आरोपी सोबत भांडण झालेल्या त्याच्या चुलत बहिणीचा देखील फिर्यादीमध्ये नाव घेतले असते. परंतु फिर्यादीमध्ये कुठेही चुलत बहिणीच्या नावाचा उल्लेख नाही. सदरचे केसमधील पिडीत • मुलगी ही केवळ ११ वर्षे वयाची आहे. आरोपी हा पिडीत मुलीचा देखील नातेवाईक आहे. पिडीत मुलगी आरोपी विरुध्द खोटे का सांगेल याबाबत कुठलेही कारण आरोपीच्या वकीलांनी मे. कोर्टासमोर आणले नाही असा युक्तीवाद केला.  सरकारी वकीलांचा युक्तीवाद तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा. न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली. 

सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी आडसुळ तसेच पो.कॉ. संजय पठारे यांनी सहकार्य केले.

 अहमदनगर ता . १६/०१/२०२३ 
 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
 विशेष सरकारी वकील , 
अहमदनगर,
मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close