जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती गोजूबावी येथे ७४ वा परजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती या ठिकाणी ७४ वा परजासत्ताक दिन उत्साहात व आनंदात संपन्न झाला .
शाळेमध्ये प्रभातफेरी , ध्योजारोहन ,मुलांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना युवा जनशक्ती पुणे प्रो प्रा संदीप रासकर यांच्या मार्फत ट्रॉफी देण्यात आल्या तसेच जाधव मेडिकल काऱ्हाटी प्रो प्रा ऋतुराज गोरख जाधव यांच्या मार्फत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही पेन व पाऊच देण्यात आले .
यासाठी शाळा व्यवस्थांपन समितीचे सदस्य व कार्यकारी सेवा सोसायटीचे सदस्य पांडुरंग मारुती जाधव यांच्या सहकार्यातुन साहित्य उपलब्ध झाले या सर्वांचे जी प शाळा जाधववस्ती गोजूबावी यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले.

