*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र- राजवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी: श्री. नारायणदास रामदास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाद्वारे साधला संवाद
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूल मधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेण्यात आला
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत परीक्षा संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महत्त्वाची माहिती घेतली.
राजवर्धन पाटील म्हणाले की ,' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी तसेच परीक्षेमध्ये मोठे यश संपादन करण्यासाठी सुरू केलेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.विद्यार्थ्यांना या माध्यमातून यशाचा कानमंत्र मिळाला आहे.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

