shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

७४ वा प्रजासत्ताक दिन पडस्थळ येथे उत्साहात साजरा.

७४ वा प्रजासत्ताक दिन पडस्थळ येथे उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: २६ जानेवारी २०२३ हा आपल्या भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच वैशालीताई मारकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात पार पडला. 
जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी गावात प्रभात फेरी काढून वंदे मातरम च्या घोषणा देऊन राष्ट्रप्रेम जागृत केले. यावेळी विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचे दर्शन उपस्थितांना पाहायला मिळाले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी पटसंख्या वाढीबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक रमेश जाधव व सहशिक्षक सुरेश घोळवे यांचे विशेष कौतुक केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सरपंच हरिदास रेडके यांनी भूषविले.
प्रगतशील बागायतदार संदिपान मारकड, पांडुरंग मारकड, सोसायटीचे चेअरमन भारत बोंगाणे, राजेंद्र बोंगाणे, रामदास रेडके, अमोल कोळेकर कुंडलिक राऊत, आप्पाराव मारकड,पोलीस पाटील गणेश राऊत, ग्रामसेवक महेश यादव, भालचंद्र बंड इतर ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश जाधव यांनी केली तर आभार सहशिक्षक सुरेश गुळवे यांनी मानले.
close