shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भिकोबानगर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भिकोबानगर येथे  प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

  प्रिंसिपल  स्वरांजली विनोद जगताप यांना रंगोत्सव मुंबई यांच्याकडून बेस्ट प्रिंसिपल अवार्ड दिला मान्यवरांच्या हस्ते .

विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलागुण दाखवून कार्यक्रमाची  वाढविली शोभा.
इंदापूर प्रतिनिधी:जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भिकोबानगर येथे २६जानेवारी २०२३ रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  डिस्लरी चेअरमन माळेगाव सह सा कारखाना अविनाश  देवकाते,बाळासाहेब लिंबाजी जगताप सैनिक भारत सरकार यांच्या हस्ते ध्वजारोहण व बहुजन महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 यावेळी प्रा. विजय देवकाते सर, चंद्रशेखर जगताप माजी सरपंच धुमाळवाडी,  नंदकुमार जगताप माजी उपसरपंच  धुमाळवाडी , जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष  विनोद जगताप, सचिव नितीन फक्कड जगताप तसेच उपाध्यक्ष राजेंद्र जगन्नाथ जगताप, अनिताताई पारधी, आशालता लोखंडे मॅडम. *नवनाथ जी जगताप बारामती सहकारी बँक विभाग प्रमुख, दादाजी खामगळ कार्यक्रमासाठी उपस्थित होते .प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलागुण दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढविली जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम ने वेगवेगळ्या नॅशनल, इंटरनॅशनल, तालुका स्तरावर मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांना या क्षेत्रात घडविणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच स्कूलच्या प्रिंसिपल  स्वरांजली विनोद जगताप यांना रंगोत्सव मुंबई यांच्याकडून बेस्ट प्रिंसिपल अॅवार्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश  देवकाते यांनी स्कूलच्या वाढत्या आलेखाचे कौतुक करून स्कूलला दहा हजार रक्कम देणगी स्वरुपात जाहीर केली.  या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक स्कूलच्या प्रिंसिपल  स्वरांजली विनोद जगताप आभार स्कूलचे अध्यक्ष  विनोद जगताप यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरपूर परिश्रम घेतले. 
close