shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुलाबी थंडीत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह..!


शिर्डी प्रतिनिधी : संजय महाजन
विद्या प्रसरिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू.मेहता ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजपूजन व ध्वजारोहण प्राचार्या श्रीमती.अंजनी गाणू यांच्या शुभहस्ते पार पडली.

      दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मान्यवरांना स्काऊट आणि गाईड विभाग कडून मानवंदना देण्यात आली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत व्ही.पी.एस हायस्कूल, मराठी प्राथमिक व इंग्रजी प्राथमिक माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकानी विद्यार्थी, पालक आणि पाहुण्यांचे मने जिंकून घेतले.

     कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालासमिती सदस्य श्री.भगवान आंबेकर यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्राचार्या श्रीमती.अंजनी गाणू , उपमुख्याध्यापक उदय महेंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, बी.सी.एस चे प्राचार्य भगत सर, मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंगल जाधव, पर्यवेक्षिका सुनीता ढिले, पर्यवेक्षक विजय रसाळ, इंग्रजी प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक प्रतिनिधी चंद्रकांत जोशी, शिक्षकेतर प्रतिनिधी जयराम उंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

     प्रशालेच्या प्राचार्या अंजनी गाणू‌ यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि पर्यावरणीय स्वच्छता किती महत्त्वाचे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.भगवान आंबेकर यांनी आपल्या ओघवत्या वाणी द्वारे विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावून सांगितले.

     आजच्या प्रजासत्ताक दिनाचे वेगळेपण म्हणजे प्राचार्या अंजनी गाणू यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांना श्री.हरिभाऊ कुलकर्णी यांनी दिलेली स्वच्छतेची प्रतिज्ञा होय.
close