shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई निर्माण शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) : शैक्षणिक बातमी 

आज 74 व्या प्रजासत्ताक दिनश्री साई निर्माण शैक्षणिक संकुल येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


 निमित्ताने श्री साई निर्माण उद्योग समूहाचे व संकुलाचे अध्यक्ष मा. श्री विजयजी कोते पाटील, मा. श्री ताराचंद कोते पा.उपाध्यक्ष सौ कविताताई ताराचंद कोते पा.  तसेच प्रमुख पाहुणे श्री अंकुश सुभाष डांगे सर, असिस्टंट कमांडन्ट, CRPF, मेजर श्री रविंद्र पवार, क्लीन अँड ग्रीन चे श्री अजितजी पारख व मणीलाल जी पटेल मेजर श्री भीमराज जी कोळगे, मेजर श्री गीते सर, श्री रघुनाथ मामा सोमवंशी, श्री चांदवडकर सर, पॅरामेडिकल चे श्री पंकज जी कांबळे सर, सिपला कंपनीचे पदाधिकारी श्री विजय सारथी, सौ. दीना  मन्होत्रा तसेच श्री दादासाहेब पानगव्हाणे व संस्थेचे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.सदर प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संकल्पनेतून साई निर्माण शैक्षणिक  संकुलातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले, यामध्ये मा. प्राचार्य श्री गणेश डांगे सर ,अध्यापक श्री महेश जोशी सर , सूत्रसंचालक श्री  सुहास भालेराव सर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाविषयी अनेक विद्यार्थ्यांचे मनोगत व चिमुकल्यानी सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा जयघोष केला याचबरोबर शासकीय एलमेंट्री चित्रकला परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व कलाशिक्षक यांना गौरवण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला यामध्ये साई निर्माण संकुलाचे प्राचार्य, मुख्याध्यापक,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम  घेतले.
close