shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज तर्फे हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी 

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डी तर्फे मकर संक्रांत हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्सहात संपन्न झाला. 

श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डी तर्फे सालाबाद प्रमाणे या हि वर्षी मकर संक्रांत २०२३ निमित्त दि.२६.०१.२०२३ रोजी साईआश्रम भक्तनिवास येथिल अॅम्फिथिएटर मध्ये संस्थेच्या स्त्री सभासद व स्त्री कर्मचारी तसेच पुरुष सभासद व पुरुष कर्मचायांच्या सुविद्य पत्नी यांचेकरीता आयोजीत हळदी कुंकू समारंभ मा. सौ. शालिनीताई राधाकृष्णजी विखे पाटील माजी अध्यक्षा, जिल्हा परिषद, अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा. सौ. कावेरीताई राहुलजी जाधव मॅडम यांचे प्रमुख उपस्थिती व मा. सौ. दुर्गाताई किसवे मॅडम, मा. सो. मंजुश्रीताई उगले मॅडम, मा. सौ. किरणताई जोरी मॅडम व मा. सौ. चंद्रकलाताई खराडे मॅडम यांचे उपस्थितीत मोठ्या उत्सहात संपन्न झाला.



संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री प्रतापराव संपतराव कोते पा. यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर माजी व्हा. चेअरमन श्री दिपक भाऊसाहेब धुमसे यांनी मा. सौ. शालिनीताई विखे पाटील यांना समारंभाचे अध्यक्षस्थान स्विकारण्याची विनंती केली त्यास संचालक श्री जितेंद्र साहेबराव गाढवे पा. यांनी अनुमोदन दिले. संस्थेच्या विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा. यांनी आपल्या प्रास्तावीक भाषणात संस्थेचे आधारस्तंभ मा. आमदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील, मार्गदर्शक मा. खासदार डॉ. सुजयदादा विखे पा. यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून यापुढे हि घेण्यात येईल असे सांगीतले तसेच संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री राहुलजी जाधव साहेब त्याच प्रमाणे सर्व अधिकारी व सभासदांचे मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार माणुन संस्था राबवित असलेले उपक्रम आणि संस्थेच्या व्यवहाराबाबत माहिती दिली.

संस्थेच्यावतीने उपस्थित महिलांना मकर संक्रांत हळदी कुंकू निमित्त व्हाईट गोल्ड डिनर सेट चे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी सुप्रसिध्द व्याख्याते मा. श्री वसंत हंकारे, सांगली यांचे सुश्राव्य व्याख्यान आयोजीत करण्यात आले होत संस्थेतर्फे आयोजीत हळदी कुंकू समारंभास महिलांनी मोठ्याप्रमाणावर उत्सपुर्त प्रतीसाद दिला. सदर प्रसंगी सौ. राधिका प्रतापराव कोते पा., सौ. ललिता दिनेश कानडे, सौ. उषा यादव कोते पा., सौ. वैशाली दिपक धुमसे, सौ. वैशाली विलास गोंदकर पा., तसेच संस्थेच्या विद्यमान चेअरमन सौ. श्रध्दा विजय कोते पा., व्हा. चेअरमन श्री दिनेश दिलीप कानडे, संचालक श्री प्रतापराव संपतराव कोते पा., श्री तुषार सुदामराव शेळके पा., श्री यादव माधवराव कोते पा., श्री जितेंद्र साहेबराव गाढवे पा., श्री दिपक भाऊसाहेब धुमसे, श्री संदिप भाऊसाहेब बनसोडे व तज्ञ संचालिका सौ. निर्मला दिगंबर सलगरकर, सचिव श्री नवाजी नामदेव डांगे पा., सह सचिव श्री विलास गोरख वाणी पा. तसेच मोठया संख्येने खी सभासद व स्त्री कर्मचारी तसेच पुरुष सभासद व पुरुष कर्मचाऱ्यांच्या सुविद्य पत्नी व सभासद उपस्थित होते शेवटी संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री यादव माधवराव कोते पा. यांनी आभार मानले.
close