shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशाचा प्रजासत्ताक दीन आज शिर्डी जवळील कनकूरी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा झाला

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भाषणे करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यात साईबाबा संस्थान एम्प्लॉइज सोसायटीचे संचालक विठ्ठल पवार  यांच्या दोन्ही कन्या भूमी विठ्ठल पवार आणि ओवी विठ्ठल पवार यांच्या भाषणांनी उपस्थित मान्यवरांना आश्चर्यचकित केले.

यावेळी शाळेच्या वतीने दोघींचे विशेष कौतुक करत त्यांना बक्षीस स्वरूपात रोख रक्कम प्रदान करण्यात आली...मात्र यावेळी या दोघींनी सदर रक्कम शाळेला पुन्हा नम्रपणे परत देत त्या रकमेचा गरजू विद्यार्थ्यांना विनियोग होण्यासाठी विनंती केली तिच्या ह्या कृतीचे उपस्थितांना अतिशय अप्रूप वाटले याप्रसंगी त्यांची आई तेथे उपस्थित होती मुलींच्या ह्या कृतीने तिच्या सुद्धा डोळ्यात आनंदाश्रू तरळले 

या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर रामभाऊ डांगे, उपसरपंच विनायक जपे, कनकुरी पोलीस पाटील विजय डांगे, भाऊसाहेब थेटे, चेअरमन बाबासाहेब डांगे, मा. चेअरमन भीमराज शिंदे, विष्णू आबाजी डांगे, सुरेश डांगे, जयवंत डांगे, अभिजीत कालेकर ,प्रदीप डांगे, ग्रामसेवक आग्रे ,शिक्षकवर्ग साळी सर  सौ.पठारे मॅडम,वायाळ सर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
close