shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

8 वी राष्ट्रीय ऐरोस्केटोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे यश


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : 7 /   नुकत्याच ठाणे येथे झालेल्या 8 वी राष्ट्रीय ऐरोस्केटोबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अत्यंत चुरशीची लढत देत राजस्थान, गुजरात,  तमिलनाडु,  तेलंगाना या राज्या सोबत झुंज देत सांघिक प्रकारात तृतीय क्रमांक पटकाविला तसेच व्यक्तीक प्रकारात अभिराज सानप [अडथळा] y या प्रकारात तृतीय,  कार्तिक मिश्रा  व आदर्श बिस्वास यांनी 1 मिनट स्केटिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले, महाराष्ट संघात नगरच्या 9 खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत संघासाठी सिंहाचा वाटा उचलला असे प्रतिपादन महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष श्री. पागवड सर,  व सचिव सुनील सर यांनी खेळाडूंना उद्देशून केले. 

सदर संघात नगर चे खेळाडू 
वरिष्ट गट
1. कार्तिक मिश्रा 
2. अभिराज सानप 
3. आदित्य रसकोंडा 

14 वर्षा खालील मुलांमधे -
1. आदर्श बिस्वास 
2. मोहम्मद हकीमजीवाला 
3. अर्नव अंदे
4. आदर्श मुथा 
5. मोहित बकाले 

या यशाबद्दल भावी खासदार श्री. सुरेंद्र गांधी यांनी कौतुक करत मुलांना शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक व कोषाध्यक्ष श्री. अमोल ठोंबे व सचिव प्रदीप पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. या शुभ प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री. सचिन गायकवाड यांनी अभिनंदन केले.
close