अशोकनगर । प्रतिनिधी :-
ग्रामीण भागातील महिलांनी गृहोद्योग सुरु करुन स्वावलंबी बनले पाहिजे.यादृष्टीने सौ.संगीताताई उमेश बनकर यांनी सुरु केलेला मसाला मेकिंग व फ्लोअर, मिलचा उद्योग प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी केले.
तालुक्यातील पढेगांव येथे स्वामी रामदासजी महाराज यांचे कृपाशिर्वादाने सौ.संगीताताई उमेश बनकर यांनी जगदंबा मसाला व फ्लोअर मिल उद्योग सुरु केला, त्याचे सौ.मंजूश्रीताई मुरकुटे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी पं. समितीच्या माजी सभापती सौ.सुनिताताई राहुल बनकर, पढेगांव सोसायटीच्या संचालिका सौ.स्वातीताई यशवंत बनकर, सौ.विद्याताई जितेंद्र तोरणे, युवक नेते सिध्दार्थ मुरकुटे, 'अशोक' चे संचालक वाय.जी.बनकर, उद्योजक जितेंद्र तोरणे, राहुल बनकर, नितिन बनकर, प्रविण लिप्टे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त करुन मसाला उद्योग व फ्लोअर मिल सुरु केल्याबद्दल अभिनंदन केले. सौ.संगीता बनकर व श्री.उमेश बाळासाहेब बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

