शिर्डी:-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निममीत राहता तालुक्यात विविध ठिकाणी महा आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. शिर्डी येथील द्वारकामाई वृद्ध आश्रम मध्ये वृद्ध साठी स्नेहभोजणाचे आयोजन करण्यात आलेले होते, तसेच शिर्डी येथील साई आश्रया अनाथ आश्रम मध्ये लहान मुलांना फळाचे वाटप करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवसा निममीत बाळासाहेबांची शिवसेना अहमदनगर जिल्हा संपर्क कार्यालय चे उद्घाटन शिर्डी येथे संपन्न झाले तसेच साकुरी येथे शिवसेना राहता तालुका महिला आघाडी प्रमुख वनिता जाधव यांचे वतीने मोफत आधार कार्ड नोंदणी तसेच मोफत आभा कार्ड वाटप करण्यात आले.
राहता येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामधे महिलांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या तसेच विविध प्रकारच्या ऑपरेशन हे मोफत करण्यात आलेले होते या प्रसंगी शिवसेना अहमद नगर जिल्हा प्रमुख श्री कमलाकर कोते, जिल्हा संघटक विजय काळे, शिरडी शहर प्रमुख सदाशिव गोंदकर, उपशहर प्रमुख राजेंद्र शेळके,राहता शहर प्रमुख सागर बोठे ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख जितेंद्र जाधव ,शिवसेना राहता तालुका महिला आघाडी प्रमुख वनिता जाधव ,राहुल गोंदकर ,विजय जगताप, किशोर तरटे ,सचिन लुटे ,गणेश दंडवते,प्रसाद पाटील,तालुका शल्य चिकित्सक श्री संजय घोलप,श्री गोकुळ घोंगरे,संजय उबाळे आदि सह मान्य वर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

