shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अलिशीबा हिराजी मावळी हिची राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेत निवड

सामोडे -  दिलीप घरटे :
अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथील विद्यार्थ्यांनी अलिशिबा हिराजी मावळी ह्या विद्यार्थीनीने आदिवासी विकास विभागांतर्गत  नाशिक येथे संपन्न झालेल्या विभागीय क्रीडा क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला असून आता तिची राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली आहे.

या तिने मिळवलेल्या यशाबद्दल क्रीडा प्रशिक्षक एम.डी.माळी,भिकन पारधी,पी.डी.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक पी.व्ही.जगताप, प्राचार्य झेड एम गवळी, शिक्षक प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.जे.पी.सोनवणे,प्रा.प्रविण पगारे व तिचे वर्गशिक्षक व्ही.डी.ठाकरे यांच्या सोबतच म.फुले.विद्याप्रसारक संस्था पिंपळनेर चे अध्यक्ष अॅड संभाजी पगारे, सचिव पुष्पलता पगारे, संचालक व्हि.एन‌.जिरेपाटील,व्ही.बी.सोनवणे, स्वप्नील पगारे, छायाताई पगारे, मिलिंद महाजन आदिंनी अभिनंदन केले.
close