shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या चांदवड येथील मंजूर घासी या गुंडावर तात्काळ कारवाई करावी,अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन - शेख बरकतअली

येवला ॥ उस्मान शेख 
चांदवड येथील पत्रकार फिरोज पठाण यांच्यासह त्यांच्या कुटुबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सशस्त्र हल्ला करणाऱ्या आरोपी मंजूर घासी यास अटक करुन पत्रकार संरक्षण कायदा व मोका  कायद्यांतर्गत त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकतअली शेख आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळाने नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) व  जिल्हाधिकारी सो. नाशिक यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

सविस्तर असे की,चांदवड येथील पत्रकार आणि महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष फिरोज सुलतानखान पठाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर दिनांक दि.१३ जानेवारी २०२३ रोजी चांदवड तेथील गुंडप्रवृत्तक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अवैध व्यावसायिक तथा खंडणीखोर मंजूर अकील घासी सह त्याच्या इतर साथीदारांनी प्राण घातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
 या घटनेतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,परंतू या टोळीचा मुख्य सुत्रधार (मोरक्या) मंजूर घासी याला अटक करण्यात चांदवड पोलीस अपयशी ठरले आहे.

या घटनेचा महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाने तिव्र निषेध नोंदविला असून या मुख्य आरोपीस देखील त्वरित अटक करून त्याने धाक बसविण्यासाठी गुन्ह्यात वापरलेले रिवाल्वर वगैरे वेपन्स जप्त करत त्याच्यावर पत्रकार संरक्षण कायदा व मोका कायदा अंतर्गत त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाचे वतीने शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकतअली व इतर पदाधिकारी आणि सदस्य यांनी एकत्रितपणे जाऊन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांना देऊन येथील अधिकाऱ्यांशी कारवाई संदर्भात सविस्तर चर्चा केली, तसेच येत्या १५  दिवसात योग्य कारवाई न झाल्यास पत्रकार संघाच्यावतीने राज्यभर ठीक ठिकाणी तिव्र स्वरुपाची आंदोलने व उपोषणे छेडले जातील असा इशाराही यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकतअली यांनी दिला.

 यावेळी अहमदनगर व नाशिक  जिल्ह्यातील पत्रकार सर्वश्री पत्रकार उस्मान के.शेख, सुखदेव सोमा केदारे, फिरोज खान पठाण,असलम बिनसाद, शौकत पठाण, एजाज सय्यद, सूर्यकांत गोसावी, कासम सय्यद, रसूल सय्यद, सखाराम पगारे, नवनाथ खुरसणे,राहुल कोळगे, रंगनाथ गंगाधर, मन्सूरभाई पठाण, यांचेसह इतर पत्रकार तथा महिला पत्रकार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरील प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख,आणि महाराष्ट्र श्रमजीवी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष इस्त्याकभाई शेख यांनी पाठिंबा दर्शविला आहे,पुढे सर्वच पत्रकार, संपादकांच्या संघटना एकवटतील असा तर्क वर्तविला जात आहे.

close