सौ.नसरीन शकील आतार यांना नॅशनल वूमन्स एक्सेल्लंन्स अवॉर्ड पुरस्कार जाहिर
माढा । प्रतिनिधी :
सोलापूर डिव्हिजन रेल्वे हॉस्पिटल कुर्डुवाडी येथे मुख्य नर्सिंग अधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ.नसरीन शकील आतार यांना दि.८ मार्च २०२३ या महिला दिनानिमित्त दिल्ली येथील नॅशनल वूमन्स एक्सेल्लंन्स अवॉर्ड पुरस्कार जाहिर झाला असुन तो पुरस्कार दिल्ली येथे दि.१२ मार्च २०२३ रोजी केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले,केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भावमिक, खासदार नवनीत राणा आदि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे,
सन १९९५ पासून रेल्वेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या सौ.नसरीन शकील आतार यांनी प्रामाणिकपणे काम करुन रेल्वे आरोग्य विभागात आपल्या कार्यकुशलतेचा एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे.
यापूर्वी देखील सौ.नसरीन आतार यांना २००४-०५ साली डी. आर. एम. सोलापुर विभाग यांचेकडून उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आलेला आहे,.चुल आणि मुल सांभाळून देखील सातत्याने आपल्या कर्तव्याच्या प्रती एकनिष्ठतेने काम करणाऱ्या सौ. नसरीन आत्तार यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. रेल्वे हॉस्पिटलमध्ये सेवा करत असताना सी.एम.एस. सोलापुर डॉ.श्री. रामकृष्ण माने सर, व डी.एम.ओ.कुर्डुवाडी डॉ. स्वेथा मिसाला मॅडम यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे, त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख, ॲड.मोहसिन शौकत शेख,साप्ता. भवानीमाताचे लक्ष्मण भिसे यांनी अभिनंदन केले आहे,तसेच रेल्वे, आरोग्य, सामाजिक अशा विविध क्षेत्रातून सर्वत्रच त्यांचे अभिनंदन होत आहे.

