संगमनेर येथील जामिया आयशा मदरसा व्यावस्थापनाचा स्तुत्य उपक्रम
राहाता - संगमनेर येथील जामिया आयशा मदरसा वसतिगृहात राहून शिक्षण घेणार्या शेकडो अनाथ व गरजु विद्यार्थिनींना आपले महाराष्ट्रातील इतिहास समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मदरसांपैकी प्रथमच संगमनेर येथील जामिया आयशा मदरसाकडून एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या सहलीचे आयोजन मदरसाचे संस्थापक अध्यक्ष ज. मिर्झा अय्याज बेग, प्रिंसिपल मौलाना अख्तरुल काद्री साहब, शेखुल हदीस ,मौलाना बद्रुद्दीन आलिमी साहब यांनी केले. सदर सहलीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थिनींना नविन ड्रेस, बुरखा, नकाब ओमटाॅवर, वालधुनी- कल्याण येथील ज. इफ्तेखार नवाब शेख व त्यांच्या टीमने उपलब्ध करून दिले. सदर शैक्षणिक सहलीच्या प्रवासासाठी झीनत टूर्स च्या लक्झरी बसेस करण्यात आल्या होत्या. दि. ०२ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री सर्व बसेस मुंबईकडे रवाना झाल्या व पहाटे मुंबईतील हज्ज हाऊस या ठिकाणी पोहचल्यावर हज्ज हाऊस कमेटी मेंबर तथा हाजी अली दर्गाहचे ट्रस्टी आलहज्ज इब्राहिम भाईजान यांनी आयोजक टीम, सर्व आपाजान (टिचर्स) आणि विद्यार्थीनींचे हार्दिक स्वागत केले. व त्यांच्या राहण्याची सोय करुन चहा, नाश्ता व जेवणाची येथेच्छ बडदास्त ठेवली. यावेळी आयोजक आणि सर्व आपाजान (टीचर्स) यांनी सर्व विद्यार्थिनींना गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, व हाजी अली दर्गाहचे दर्शन घडवून त्यांना सदर स्थानांबद्दल विशेष माहिती देण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थिनींनी सहलीचा मनसोक्तपणे आनंद लुटला.
सदर शैक्षणिक सहलीच्या कार्यक्रमास हज्ज हाऊस मेंबर तथा हाजी अली दर्गाह चे ट्रस्टी आलहज्ज इब्राहिम भाईजान, अहमदभाई हाजी अली दर्गाह , समीरभाई झीनत टूर्स, आणि विशेषतः मुंबई पोलिसांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी जामिया आयशा यतिमखाना कंजुल इमान मदरसातर्फे संस्थापक अध्यक्ष ज. मिर्झा अय्याज बेग यांनी मुंबई पोलिसांचे विशेष सहकार्याबद्दल मनःपुर्वक आभार मानले.

