shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भीमा खोरे विकास प्रतिष्ठान पडस्थळ यांच्यावतीने भव्य खुल्या डान्स स्पर्धा संपन्न.

भीमा खोरे विकास प्रतिष्ठान पडस्थळ यांच्यावतीने भव्य खुल्या डान्स स्पर्धा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: पडस्थळ ता. इंदापूर( दि. ११ फेब्रुवारी) भीमा खोरे विकास प्रतिष्ठान पडस्थळ व विशाल तात्या मारकड मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य डान्स स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडस्थळ येथे संपन्न झाल्या असून या स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शशिकांत तरंगे यांनी दीप प्रज्वलित केले व उपस्थित सर्व कलाकारांना मार्गदर्शन करून कौतुकाची थाप दिली. तसेच आयोजक यांचे कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध केल्याबद्दल आभार म्हणून कौतुक केले.
या कार्यक्रमाप्रसंगी चाकाटी गावचे सरपंच संजय रुपनवर यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आला. यावेळी केके कचरे, विष्णू पाटील, नाना नरूटे, सागर रेडके, भारत मारकड, विलास मारकड, बापू रेडके, परशुराम रेडके, भाऊ रेडके ,लक्ष्मण मारकड, दत्ता रेडके, रामभाऊ बोंगाणे ,भिवाजी आवटे, धनाजी मारकड, पिंटू पाटील, राहुल मारकड, परमेश्वर कोळेकर व इतर मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये ग्रुप डान्स या प्रथम पारितोषिक साठी महाराष्ट्र पोलीस गणेश पारेकर व ज्योतीराम देवकाते यांच्यावतीने श्री गणेश अकॅडमी यांनी पटकावले असून
द्वितीय महाराष्ट्र पोलीस तात्यासाहेब माने, महेश कोपनर यांच्यावतीने देण्यात आले असून गीतांजली स्वरांजली यांनी पटकावले. तृतीय पारितोषक महाराष्ट्र पोलीस प्रकाश झेंडे यांच्यावतीने श्रावणी, निकिता यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ पारितोषिक आकर्षक ट्रॉफी यांनी मिळवले.
सोलो डान्स स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषक बालरोग तज्ञ डॉक्टर देविदास बोंगाणे यांच्यावतीने देण्यात येणारे उमेश शिंदे यांनी पटकावले
 द्वितीय महाराष्ट्र पोलीस अमोल राऊत यांच्यावतीने देण्यात येणारे
ऐश्वर्या काटकर, जाकिया लालचंद यांना विभागून देण्यात आले.तृतीय पारितोषक महाराष्ट्र पोलीस तानाजी राऊत यांच्या वतीने देण्यात येणारे 
कार्तिकी नागतोडे अनुष्का गायकवाड यांना विभागून देण्यात आले तर उत्तेजनार्थ पारितोषिक आकर्षक ट्रॉफी विजय लांडगे यांना देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी डीजे सिस्टीम व लाईट महाराष्ट्र पोलीस संतोष मारकड, शैलेश हंडाळ, महेश बोंगाणे, डॉ. दत्ता मारकड यांच्या वतीने देण्यात आले तसेच विजेत्या स्पर्धकास एडवोकेट शत्रुघ्न चोरमले बालवीर स्पोर्ट्स यांच्यातर्फे आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. या कार्यक्रमास येणाऱ्या महिला भगिनींना सौ जिजाताई रेडके यांच्यातर्फे चिठ्ठीद्वारे सोडत करून एक आकर्षक पैठणी देण्यात आली.
close