काळाशीकरांनी मताधिक्य दिले ते मी कधीच विसरणार नाही - आ. दत्तात्रय भरणे.
कळाशी येथे विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभ व नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी सत्कार समारंभ संपन्न.
गंगावळण येथील भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश.
इंदापूर प्रतिनिधी: कळाशी ता. इंदापूर ग्रामपंचायत कळाशी आयोजित विविध विकास कामाचा उद्घाटन समारंभ नूतन ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, अभिजीत तांबिले, मधुकर भरणे , अतुल झगडे,शुभम निंबाळकर, अमोल भिसे ,सतीश पांढरे ,नवनाथ रुपनवर, छायाताई पडसळकर, वीरसिंह रणसिंग, सचिन खामगळ, प्रतीक्षा बालगुडे, संजय सोनवणे, नाना नरूटे, संदेश देवकर, राजेंद्र गोलांडे, साहेबराव चोपडे ,आजिनाथ रेडके ,मनोहर ढुके ,असे अनेक मान्यवर उपस्थित होत
काळाशी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ रुपालीताई राजेंद्र गोलांडे, उपसरपंच लतिकाताई नवनाथ करे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा धनाजी चव्हाण, वैशाली संतोष देवमाने ,अंकुश जनार्दन शिंदे ,विजय रामदास रेडके ,सुप्रिया बबन करे ,या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार मामांच्या हस्ते करण्यात आला.
काळाशी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ रुपालीताई राजेंद्र गोलांडे, उपसरपंच लतिकाताई नवनाथ करे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा धनाजी चव्हाण, वैशाली संतोष देवमाने ,अंकुश जनार्दन शिंदे ,विजय रामदास रेडके ,सुप्रिया बबन करे ,या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार मामांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी कळाशी विकास सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन अविनाश सूर्यवंशी ,व्हाईस चेअरमन दादासाहेब भालेकर, संचालक पृथ्वीराज चव्हाण, हनुमंत बाबर, विलास गोलांडे ,कोंडीबा करे ,दत्तात्रय रेडके, शानुर शेख ,सहदेव करे, मोहन भोई ,अंकुश शिंदे ,सौ कांचन चंद्रकांत देवकर ,सौ सुरेखा तुकाराम गोलांडे ,पोपट लोखंडे, हनुमंत वाघमोडे, यांचाही सत्कार मामांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमासाठी कळाशी मधून कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गोलांडे संचालक पुणे जिल्हा सहकारी बोर्ड पुणे यांनी केले कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून तुकाराम गोलांडे माजी सरपंच वउपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका ,शंकर करे ,अमोल देवकर, सतीश चव्हाण ,शिवाजी भोई, संतोष लोखंडे ,दयानंद गायकवाड ,नामदेव रेडके ,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की,कळाशीकर तुम्ही काम सांगायची निवेदन देण्याची काही गरज नाही. तुम्ही घरची माणसं, राजाभाऊ गोलांडे हा सच्चा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याच्या पाठिंबामुळेच राजेंद्र गोलांडे आहेत परंतु राजाभाऊ हा राजाच. विधानसभेत तुमच्या गावाचा आभार मानायचय, विधानसभेला मतदान मागायला आलो नाही. सहभाग घेतली नाही. मतदाना वेळी भाषण न करता सुद्धा काळाशीकरांनी मताधिक्य दिले आहे. ते मी कधीच विसरणार नाही. २००९ ला रात्र रात्र प्रचार केला . २०१४ ला खूप प्रचार केला . पण मला काय माहित नाही. २०१९ ला का प्रचार केला नाही. तालुक्यातील १४६ गावांपैकी फक्त १२ गावात प्रचारला यावेळी गेलो आहे. पवार साहेब, मेटकरी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली .इंदापूरचे लोक किती चांगले आहेत. मी भाग्यवान आहे. ज्या लोकांमध्ये प्रचार न करता. त्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. निवडणुकीत ज्यांना ज्यांना मदत केली. ती लोक मला सगळी सोडून जात होती. व्हाट्सअप वर फोटो बघायला मिळायचं. खूप वाईट वाटायचं. खूप दुःख व्हायचं. पण तुमच्या जीवावरती मला वाटायचं एक मताने का होईना या तालुक्याचा आमदार मीच आहे. हे तुमच्या आशीर्वादामुळे वाटायचं. खरंतर वाटायचं मला माहित नव्हतं मी मंत्री होईल परंतु पवार साहेबांच्या जादूने मी झालो. मंत्री झाल्यावर मला वाटलं की मंत्री रुबाब करण्यासाठी नाही तर गोरगरीब मागासवर्गीय अल्पसंख्याकांसाठी काम करण्यासाठी आहे .१९ वर्षात त्यांनी चूक केली ती चूक आपण करायची नाही अशा शब्दात त्यांनी अनेक मुद्द्यावरती भाष्य करत आपले मनोगत व्यक्त केले.
----------------------------------------
चौकट:
गंगावळण येथील भाजप कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश.
गंगावळण येथील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिनांक १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी कळाशी येथील जाहीर सभेमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत माजी सरपंच बिभीशन बोंगाणे , माजी उपसरपंच जालिंदर जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष पोपट बोंगाणे, चेअरमन राजेंद्र जगताप, माजी चेअरमन गोरख बोंगाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश लोखंडे यांच्यासह दिलीप पवार, गणेश नलवडे, विशाल वाळुंजकर, पांडुरंग नलवडे, महेश गायकवाड, श्रीरंग नलवडे, आबा सोनवणे, नारायण कनेरे, नाना सूर्यवंशी ,नितीन वाघमोडे, प्रभाकर बोंगाणे, हनुमंत बोंगाणे, भारत बोंगाणे, शिवाजी बोंगाणे, सौरभ कदम, दादा सूर्यवंशी, अजिंक्य जगताप, उद्धव पाटील, दत्तात्रेय सोनवणे, या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
महादेव चांगदेव सूर्यवंशी यांचे सोशल मीडियाच्या इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मामांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नियुक्तीपत्र देण्यात आले

