श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयांमध्ये पारंपारिक ऊर्जा स्रोत वापर व प्रसार विषय कार्यशाळेचे आयोजन .
इंदापूर: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालय बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी " *पारंपारिक ऊर्जा स्रोत वापर व प्रसार"* या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. ऋषिकेश रायते यांनी सांगितले की , पाठीमागच्या शतकात उद्योगधंद्याचा विकास ,जगाचा विकास झाल्यामुळे ऊर्जेचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लोकांचे जीवनमान सुधारले आहे. या ऊर्जा साधनांमध्ये दगडी कोळसा, खनिज तेल,नैसर्गिक वायूचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जाऊ लागला आहे.पारंपारिक ऊर्जा स्रोत निर्माण करता येत नाहीत.परंतु त्याचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात करत आहोत त्याच्या अतिरिक्त वापरामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.इंधन म्हणून पारंपारिक ऊर्जा साधने वापरत असताना खूप मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो.त्या धुरामध्ये वेगवेगळे गॅसेस असतात.त्यांना ग्रीन हाऊस गॅस म्हणतो ग्रीन हाऊस गॅसमुळे पृथ्वीचे रक्षण करणारा ओझोन वायूचा थराला छिद्रे पडलेले आहे.त्यामुळे सजीव सृष्टीला धोका निर्माण झाला आहे. तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी प्रा.धुळदेव वाघमोडे म्हणाले, पृथ्वीवरील लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे.त्यामुळे ऊर्जा, स्त्रोताचा वापर वाढतो आहे.त्यामुळे कोळसा, पेट्रोल, डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांचे साठे मर्यादित असल्यामुळे संपण्याचा धोका निर्माण होतोय, त्यामुळे जपून वापरणे गरजेचे आहे.त्यामुळे पारंपारिक ऊर्जा श्रोतांना पर्यायी पूरक स्त्रोत वापरणे सोयीस्कर ठरेल.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.लहू वावरे म्हणाले की, भविष्यकाळात पारंपारिक ऊर्जा स्रोत हे महत्त्वाचे आहेत. या गोष्टी आपण नाकारू शकत नाही अपारंपारिक ऊर्जा साधनांकडे आपणाला लक्ष देण्याची गरज आहे .कारण त्यामुळे ऊर्जेची आवश्यकता व उत्पन्नाच्या मधील अंतर कमी होईल.त्यामुळे पारंपारिक ऊर्जा श्रोताचे संरक्षण होईल. प्रदूषण नियंत्रण होईल, ऊर्जा साधनांचा ताण कमी होईल. त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सामाजिक जीवन स्तर सुधारेल.
प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.प्रवीण घोगरे यांनी केले.सूत्रसंचालन कु.नीलम धोत्रे कु.सोनल सुतार यांनी केली. आभार प्रा.अर्चना हरिहर मॅडम यांनी मानले.सदर कार्यक्रमास प्रा.संजय मोरे प्रा.सुदर्शन गोळे प्रा.सोनम पवार प्रा.प्राजक्ता बागल प्रा.रोहिणी सावंत प्रा.प्रेरणा पवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष *. हर्षवर्धन पाटील मा सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक *.उदयसिंह पाटील* , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष *. मनोज पाटील* , शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सरपंच *.किरण पाटील* व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

