निरा भिमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पिटकेश्वर, सराफवाडी,100 ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी.
इंदापूर प्रतिनिधी: शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 2/2/2023 रोजी सकाळी नऊ वाजता ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी निरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सराफवाडी, पिटकेश्वर, गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करतेवेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी श्री पाटील भागवत खंडेराव ॲग्री ओरशेल काटी गट,,चिटबॅय श्री. सोलंकर संतोष मल्हारी यांच्या मार्गदर्शनाखाली आजची आरोग्य तपासणी करताना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे श्री.दिलीप गणपत अभंग साहेब गोडवान क्लर्क, यांच्या शेतामध्ये ऊसतोड चालू होती ,त्यावेळी शिवरकर रत्नदीप, जाधव भारत, जगदाळे हनुमंत ,मोहिते रविराज, राजेंद्र गायकवाड ,नंदकुमार येरळकर, नानासाहेब बोडके, घनश्याम गायकवाड, संतोष गायकवाड, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी संपन्न झाली केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार, नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय रणजीत साठे, केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण सर व संजय शेलार सर या सर्वांचे उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी पूर्ण झाली.

