राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे इयत्ता दहावी मधील ३५ विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्न संचाचे वाटप .
इंदापूर:भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोअर कमिटीचे तालुकाप्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे युवा संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर जि. पुणे मधील सहशिक्षक श्री अरुण लक्ष्मण राऊत ( सर ) यांच्याकडून इयत्ता दहावी मधील हुशार व अभ्यासू 35 विद्यार्थ्यांना आज वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासासाठी 21 अपेक्षित प्रश्न संचाचे वाटप करण्यात आले . याप्रसंगी हायस्कूलचे प्राचार्य विकास फलफले सर , उपमुख्याध्यापक अशोक भोईटे सर , पर्यवेक्षक जयसिंग शिंगाडे सर, पर्यवेक्षक दादासाहेब जावीर सर , पर्यवेक्षिका सौ. सुनंदा वाघमारे मॅडम व हायस्कूल मधील सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षिकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर सर यांनी केले. याप्रसंगी राजवर्धन पाटील यांना हायस्कूल मधील सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

