नगर तालुक्यातील अकोळनेर (कोळगेवाडी) येथे दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत गेले असता ग्राहक बाबासाहेब रामभाऊ कोळगे हे मीटरपूर्वी सर्विस वायरला कट करून अनाधिकृतपणे वीज चोरी करत असल्याचे आढळून आले त्यांना वीज चोरीचे देयक देण्यात आले होते पण त्यांनी न भरल्यामुळे त्यांच्यावर वीज कायदा 2003 कलम 135 नुसार नगर तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 0092 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला पुढील तपास सब इन्स्पेक्टर राजेंद्र अशोक सानप करत आहेत.
मीटरला फेर फार करणे, विजेच्या तारेवर आकडा टाकणे, सर्विस वायर कट करुन अनाधिकृत विजेचा वापर करणे कायद्याने गुन्हा असुन जबर दंड अथवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते त्यामुळे असे गैरप्रकार न करण्याचे आवाहन श्री बराट यांनी केले.


