shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गिरझणी-अकलूज येथे विधवा महिलांसाठी हळदीकुंकू!

गिरझणी-अकलूज येथे विधवा महिलांसाठी हळदीकुंकू!
फोटो:-गिरझणी- अकलूज येथे विधवा महिलांचा संक्रातीचे वाण देऊन सन्मान करण्यात आला.
इंदापूर प्रतिनिधी (गिरझणी-अकलूज):  विधवा महिलांना सुवासिनींचा मान मिळावा, स्त्री म्हणून सन्मानाने जगता यावे यासाठी गिरझणी (अकलूज) येथे मकरसंक्रांतीचे औचित्य साधून समाजातील विधवा महिलांसाठी  हळदी-कुंकवाच्या कार्यक्रम बुधवारी (दि.25) संपन्न झाला. 
          या कार्यक्रमामध्ये विधवा महिलांना हळदी-कुंकू लावून इतर महिलाप्रमाणे संक्रातीचा वाण देण्यात आला. तसेच विधवा महिलांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन अनिता महादेव माने यांनी केले. या कार्यक्रमासाठी त्यांना पती महादेव माने यांचे सहकार्य लाभले. जुन्या रूढी परंपरांमुळे विधवा महिला घरात बसतात, रडतात, त्यांचे मानसिक खच्चीकरण सुरु असते. मात्र विधवा स्त्रीलाही जगण्याचा हक्क आहे, समाजाने त्यांना मानसन्मान देऊन मानसिक आधार देण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांमुळे  विधवा महिलांना आत्मसन्मान प्राप्त होत आहे व समाजाची मानसिकताही बदलत आहे. आता प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम घेणार असल्याचे अनिता माने यांनी नमूद केले. दरम्यान, या  कार्यक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.


close