shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरातून रॅपिड ऍक्शन फोर्स आणि इंदापूर पोलिसांचे संचलन

इंदापूर शहरातून रॅपिड ऍक्शन फोर्स आणि इंदापूर पोलिसांचे  संचलन.
इंदापूर: इंदापूर शहरात रॅपिड ऍक्शन फोर्स (दंगा नियंत्रण पथक) आणि इंदापूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंगळवारी ( ता.२१) फेब्रुवारी  इंदापूर शहरातून संचलन केले. 
या संचलनामध्ये वज्र वाहनाचा  समावेश होता. इंदापूर पोलीस स्टेशन - जुना पुणे सोलापूर हायवे मार्गे -  कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय - दर्गा मज्जित चौक -  नेहरू चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून पुन्हा पोलीस स्टेशन येथे हा मार्च दाखल झाला. यामध्ये उप कमांडेड श्री माओतोशी, सहाय्यक कमांडेड श्रीमती स्वाती तांदळे ,पोलीस निरीक्षक पवन कुमार, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुशीला यासह रॅपिड ॲक्शन फोर्स तलोजा नवी मुंबईचे ६० कमांडो इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे ,नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटोळे ,दाजी देठे ,महिला पोलीस उपनिरीक्षक अर्पणा जाधव आणि ३० पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
close