shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रहारच्या प्रयत्नातून एकल भगिनीला वीस हजार रुपयांची आर्थिक मदत..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बुधवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२३

प्रहारच्या प्रयत्नातून एकल भगिनीला वीस हजार रुपयांची आर्थिक मदत..!!

राहुरी  : देवळाली प्रवरा येथील एकल भगिनी सुषमा अशोक पळंदे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या प्रयत्नाने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून राहुरी तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार मा. पूनम दंडीले मॅडम यांचे हस्ते आज वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
     प्रसंगी अव्वल कारकून मा.  शैलजा देवकाते मॅडम, संजय गांधी योजनेचे मंगेश साठे, प्रहार जनशक्ति पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा प्रहार श्रमिक सेवा संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार श्रमिक सेवा संघाचे सचिव बाळासाहेब कराळे, प्रहारचे देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष किरण पंडित आदी उपस्थित होते.

       देवळाली प्रवरा येथील एकल भगिनी सुषमा पाळंदे यांचे पती अशोक पाळंदे यांचा नुकताच अपघाती मृत्यू झाल्याने सुषमाताई यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील प्रहारचे कार्यकर्ते धावून आले, व जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत सुषमा पाळंदे यांना तात्काळ मदत देण्याची राहुरी तहसीलदार साहेब यांचेकडे प्रहार चे आप्पासाहेब ढूस यांनी विनंती केली.  त्या विनंतीस मान देऊन राहुरीच्या तहसीलदारांनी तात्काळ सुषमा पाळंदे यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून वीस हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. आज प्रहार कार्यकर्त्यांचा उपस्थितीत सुषमा पाळंदे यांना नायब तहसीलदार पुनम दंडीले मॅडम यांचे हस्ते वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 
      तसेच संजय गांधी निराधार योजनेसाठी सुध्दा श्रीमती पाळंदे यांचा अर्ज भरून घेतला असून लवकरच त्यांना या योजनेचाही लाभ देण्यात येईल असे नायब तहसीलदार दंडीले मॅडम यांनी सांगितले. 

      तहसिल कार्यालयाकडून एकल भगिनी सुषमा पाळंदे यांना तात्काळ मदत  दिल्या बद्दल आप्पासाहेब ढूस यांनी तहसीलदार एफ आर शेख साहेब यांचेसह सर्व नायब तहसीलदार आणि तहसील कर्मचारी व या कामी सहकार्य केलेल्या बाळासाहेब कराळे यांचेसह सर्व प्रहार कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close