shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.


बांडेवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

नृत्य अविष्कार पाहून ग्रामस्थांनी रोख रकमेसह बक्षीस देऊन केले विद्यार्थ्यांचे कौतुक.

इंदापूर: दि २० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी बांडेवाडी यांचे संयुक्तपणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणविस्तार अधिकारी हनुमंत देवकाते यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
         कार्यक्रमात देशभक्तीपर  मराठी , हिंदी गाणी , गणेश वंदना , लोकनृत्य , लावणी , कोळीनृत्य , गवळण , फ्युजन सॉंग अशा विविध गाण्यावर सुंदर नृत्याविष्कार सादर केले. प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. पंचवीस हजार रूपयांची बक्षिस जमा झाली.*
         या कार्यक्रमासाठी उपसरपंच कैलास भोसले , ग्रा पं सदस्य विकास शिंदे , भालचंद्र बांडे , बाळू बांडे सर , पोलीस पाटील अनिल कुचेकर , पतसंस्थेचे सचिव बाळाजी बांडे ,  आप्पा बांडे , किरण काळे , शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन हरिश काळेल , शिक्षक पतसंस्थेचे संचालक भारत बांडे , सीवायडीए समन्वयक किरण यादव , रोहित साळुंखे ,  संजय जाधव , उन्मेश कुचेकर , सागर रणसिंग , भारत शेंडे ग्रामस्थ , पालक , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत शाळा समिती अध्यक्ष दिपक बांडे , सदस्य बापुसो राहिगुडे , अशिब मुलाणी , सचिन बांडे यांनी केले . संयोजन अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले व उर्मिला बांडे यांनी केले. सुत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले.

close